Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

मावळा पर्यटन बंदी

मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश; ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू

Mavala Tourism Ban: मावळातील अनेक पर्यटन स्थळांवर ३१ ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश सुरक्षा आणि अपघात रोकण्यासाठी घेतला गेला आहे.


मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू

Mavala Tourism Ban |

 

पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबई/ पुणे (Mavala Tourism Ban) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढती गर्दी, संभाव्य अपघात तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ लागू करण्यात आले आहे. हा आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. या आदेशानुसार (Mavala Tourism Ban) मावळ तालुक्यातील मौजे लोणावळा परिसरातील भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट , शिवलिंग पाईन्ट, एकविरा देवी कार्ला लेणी तसेच पवना धरण परिसर या प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू करण्यात आली आहेत.

पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे, पाण्यात उतरणे, वाहतूक कोंडी, सार्वजनिक शांततेचा भंग आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने ही (Mavala Tourism Ban) प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे. प्रशासनाने पर्यटकांना आदेशातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले असून, धोकादायक कडे, धबधबे आणि पाणीसाठ्यांच्या परिसरात सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.