Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

आ. डॉ. राहुल पाटील

मराठवाड्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करा: आ. डॉ. पाटील

MLA Dr. Rahul Patil: परभणी जिल्ह्यास मराठवाड्यात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी, रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार होत असल्याचा मुद्दा


मराठवाड्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करा आ डॉ पाटील

MLA Dr. Rahul Patil |

 

बोगस डॉक्टरांचा प्रश्न विधानसभेत मांडला; सरकारकडून कारवाईचे आश्वासन

परभणी (MLA Dr. Rahul Patil) : जिल्ह्यास मराठवाड्यात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत केली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

परभणी सह मराठवाडा विभागात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार होत असल्याचा मुद्दा आ. डॉ. राहुल पाटील (MLA Dr. Rahul Patil) यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी उपस्थित केला. यावेळी बोलताना आ.डॉ.पाटील म्हणाले, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. विशेषतः बंगाली डॉक्टर्सकडे कुठलीही पदवी नाही, तरी देखील ते ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करत रुग्णांच्या जीविताशी खेळत आहेत.

यामुळे या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी आ.डॉ. पाटील (MLA Dr. Rahul Patil) यांनी केली. पुढे ते म्हणाले बोगस डॉक्टरंवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती आहेत, परंतु त्या समिती कुठल्याही प्रकारची तपासणी अथवा बोगस डॉक्टरांवर कारवाई करत नसल्याचा आरोप यावेळी आ.डॉ. पाटील यांनी केला. या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करावा,  त्यामुळे अशा सर्व बोगस डॉक्टरांची तपासणी करून त्यांचा वैद्यकीय परवाना पहावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आ. पाटील यांनी शासनाकडे केली. त्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले बोगस डॉक्टर्स संदर्भात तपासणीसाठी असलेल्या समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग करण्यात येईल. नव्याने समित्यांची नियुक्ती करू असे हसन मुश्रीफ म्हणाले. नागरिकांनी बोगस डॉक्टरांच्या तक्रारी कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. आ. डॉ. पाटील (MLA Dr. Rahul Patil) यांच्या या प्रश्नामुळे बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून सरकार निश्चितच याकडे लक्ष देऊन बोगस डॉक्टरांना आळा घालील अशी आशा निर्माण झाली आहे

Related to this topic: