Fetal Sex Determination Case: गर्भलिंग निदानाच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच कठोर कलमे टाळण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १५ लाख रुपयांची लाच
१५ लाखांसाठी दोन पोलिस हवालदारांसह चौघे एसीबीच्या जाळ्यात
पुणे (Fetal Sex Determination Case) : गर्भलिंग निदानाच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच कठोर कलमे टाळण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन पोलिस हवालदारांसह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या (Fetal Sex Determination Case) कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन, गर्भलिंगनिदान विरोधी कायद्याची कलमे न लावण्यासाठी गुन्ह्याचे तपास अधिकारी यांच्यासाठी २५ लाख रुपये व स्वतःसाठी ५ लाख रुपये, अशी लाच मागणी करून पोलिस हवालदाराने १० लाखांची लाच घेतली. त्यानंतर राहिलेल्या पंधरा लाखांच्या लाचेत दोन पोलिस कर्मचारी आणि दोन खासगी व्यक्ती जाळ्यात अडकले. यातील खासगी व्यक्तींना लाच घेतना रंगेहाथ एसीबीच्या पथकाने पकडले. तर, दोघे पोलिस हवालदार हे फरार झाले आहेत. (Fetal Sex Determination Case) आबा सावळा वळकुंदे ( ४८) आणि महादेव पंढरी माने (३९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे , राहुल मारुती वाघ अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत.