पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची मागणी..!
परभणी (Minister Ramdas Athawale) : आंबेडकरी चळवळीचा परभणी जिल्हा हा बाल्लेकिल्ला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरण लढ्यात देखील या जिल्ह्यातील अनेक भीमसैनिकांनी सक्रीय सहभाग घेतला होता. या जिल्ह्यात मागासवर्गीय व सवर्ण यांच्यातील संबंध मैत्रिपूर्ण असून काही ठिकाणी मात्र अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. पूर्णा तालुक्यातील गौर येथील संतोष साळवे या तरून कार्यकर्त्याची कट रचून चारचाकी वाहनाने धडक देऊन त्याचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय (Minister Ramdas Athawale) राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परभणी येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) हे बुधवार १९ ऑगस्ट रोजी आले होते. सकाळी ११.३० सावली शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णा तालुक्यातील गौर येथील संतोष साळवे खून प्रकरणा विषयी आपली भूमिका मांडली. यावेळी रिपाई राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.सिध्दार्थ भालेराव, राज्यसचिव डी.एन.दाभाडे, जिल्हाध्यक्ष डॉ.विजय गायकवाड, राणूबाई वायवळ, निवृत्ती हत्तीअंबीरे, वैâलास दाभाडे, विजय सोनवणे, जयप्रकाश इंगोले, अॅड.लक्ष्मण बनसोडे, उत्तम वाव्हळे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ना.आठवले (Minister Ramdas Athawale) म्हणाले की, समाजातील दलित-मराठा वाद न होता सर्व समाजांनी एकत्रित राहिले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही पहिली मागणी आपण केली असून रेकॉर्डनूसार ओबीसी नोंद असलेल्या मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, परंतू मनोज जरांगे पाटील यांची सरसकट ओबीसी प्रमाणपत्राची मागणी ही अयोग्य आहे. केंद्रातील मोदी सरकारने ८ लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या सर्व समाजातील घटकांना आरक्षण लागू केले आहे. कॉक्रोज पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील असून त्यांनी दिल्ली येथे केलेले आंदोलन हे योग्य प्रश्नावर केले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व मागण्या मोदी सरकारने मंजूर केल्या आहेत.
तसेच अ, ब, क, ड च्या नावाखाली बौध्द-मातंग वाद होऊ नये, अनुसूचित जातीतील सर्व समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा, परंतू आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून बौध्द समाजावर देखील अन्याय होऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. मातंग समाजाच्या विकासासाठी आर्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रिपाई एैक्य होणार असेल तर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आनंदच होईल, असेही (Minister Ramdas Athawale) ना. आठवले यांनी सांगीतले.