Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > महाराष्ट्र

मराठा आरक्षण आत्महत्या

मराठा आरक्षण व हैद्राबाद गॅझेटसाठी एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Maratha Reservation Suicide: वसमत तालुक्यातील बळेगाव येथील ४८ वर्षीय व्यक्तीने मराठा आरक्षण व हैद्राबाद गॅझेटसाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने हट्टा पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिय


मराठा आरक्षण व हैद्राबाद गॅझेटसाठी एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Maratha Reservation Suicide |

 

वसमत तालुक्यातील बळेगाव येथील घटना

हिंगोली (Maratha Reservation Suicide) : वसमत तालुक्यातील बळेगाव येथील ४८ वर्षीय व्यक्तीने मराठा आरक्षण व हैद्राबाद गॅझेटसाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने हट्टा पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिस सुत्राकडुन मिळालेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील बळेगाव येथील नवनाथ रंगनाथ गोटे (४८) हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नेहमीच सक्रीय होते. मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या हिंगोली जिल्ह्यातील सभांसाठी देखील त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. (Maratha Reservation Suicide) मराठा समाजाचा आरक्षण मिळाले पाहिजे तसेच हैद्राबाद गॅझेट लागु झाला पाहिजे असे ते नेहमी बोलुन दाखवत होते. ३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास शेतामध्ये गेले होते. परंतु बराच वेळ होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटूंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. याच दरम्यान झाडाला लटकलेल्या अवस्थेत नवनाथचा मृतदेह दिसून आला.

या (Maratha Reservation Suicide) बाबतची माहिती हट्टा पोलिस ठाण्याला दिल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, संदिप सुरूशे, संदिप चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिल्या नंतर पाहणी केली. या वेळी नवनाथच्या खिशामध्ये चिठ्ठी आढळली. ‘हैद्राबाद गॅझेटसाठी मी मरत आहे मला माफ करा’ असे चिठ्ठीमध्ये नमुद केले होते. या नंतर नवनाथचा मृतदेह वसमत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. ४ मे रोजी शव विच्छेदन झाल्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मयत नवनाथ यांच्या पश्च्यात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. नवनाथच्या आत्महत्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.