Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील उपोषण

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; सकल मराठा समाजाचा ठिय्या

Manoj Jarange Patil Protest: राठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी लातूर जिल्हा बंद..


मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा सकल मराठा समाजाचा ठिय्या

Manoj Jarange Patil Protest |

 

उद्या लातूर जिल्हा बंदची हाक

लातूर (Manoj Jarange Patil Protest) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी (दि. 3 सप्टेंबर) लातूर जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. बुधवारी ( दि.2)  लातूर येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर समाजबांधवांनी मोटारसायकल रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन केले व तेथूनही त्यांनी बंदची हाक दिली. यावेळी रस्त्यावर ठिय्या देऊन समाजबांधवांनी आरक्षण समर्थनार्थ व सकारविरोधात घोषणाबाजी केली.

बुधवारी  हॉटेल लक्ष्मी येथे झालेल्या बैठकीत समाजबांधव व भगिनींनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली. मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून अनेक कुटुंबांना संसाराचा तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण झाले आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे समाजीतील अनेक शेतकऱ्यांनी व  बेरोजगारीमुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. हे चित्र बदलण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे असून, यासाठीच मनोज जरांगे पाटील आंदोलन (Manoj Jarange Patil Protest) करीत आहेत.

मात्र, सरकारकडून वारंवार आश्वासने देऊन आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Protest) यांच्या प्रकृतीचा व मराठा समाजाच्या परीस्थितीचा  विचार करून सरकारने तातडीने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.अन्यथा कोणत्याही मंत्र्याचा अथवा लोकप्रतिनिधीचा कार्यक्रम जिल्ह्यात होऊ देणार नाही, असा इशाराही बैठकीतून देण्यात आला.हा बंद गुरुवारी सकाळी सात वाजता सुरू होणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत. बंदला सहकार्य करण्याचे आवाहन संबंधितांना करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.