Gen Z Filmmaking: मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीचा, विशेषतः जेन झी प्रेक्षकांचा वेध घेणारा आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स तांत्रिक माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या विशेष चित्रपट निर्मिती..
Adv. Ashish Shelar |
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती
मुंबई (Gen Z Filmmaking) : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीचा, विशेषतः जेन झी प्रेक्षकांचा वेध घेणारा तसेच आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अन्य तांत्रिक माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या विशेष (Maharashtra Film Production) चित्रपटाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासन सहभाग घेणार, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी केली.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. (Gen Z Filmmaking) मराठी चित्रपटांचा दर्जा, गुणवत्ता, नावीन्य आणि अभिनय याबाबत कोणतीही कमतरता नसून व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेल्या ‘कनेक्टिंग लिंक’वर काम करण्याची गरज असल्याचे (Adv. Ashish Shelar) त्यांनी सांगितले.
मराठी चित्रपटसृष्टीने दर्जेदार आशय आणि नाविन्यपूर्ण मांडणीची परंपरा कायम ठेवली आहे. मात्र (Maharashtra Film Production) निर्मितीइतकाच स्क्रीन, वितरण आणि प्रेक्षकवर्ग यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी व्यवहार्य मॉडेल तयार झाल्यास महाराष्ट्र शासन त्यात गुंतवणूकदार म्हणून भूमिका घेईल, असे ॲड. शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी सांगितले.