Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

महाराष्ट्र एआय रेडी' मोहिम

ऑनलाईन मोफत एआय मास्टरक्लासचा लाभ घ्यावा; महेश पत्रिके यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Maharashtra AI-Ready: गेल्या २५ वर्षांत १.७ कोटींहून अधिक नागरिकांना डिजिटल साक्षर करणाऱ्या 'एमएस-सीआयटी' अभ्यासक्रमाला  डिजिटल साक्षरता श्रेणीमध्ये देशातील अत्यंत मानाचा 'स्कॉच अवॉर्ड'


ऑनलाईन मोफत एआय मास्टरक्लासचा लाभ घ्यावा महेश पत्रिके यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Maharashtra AI-Ready |

 

एमकेसीएलच्या रौप्यमहोत्सवी वर्षात एमएस-सीआयटीला प्रतिष्ठित स्कॉच अवॉर्ड

महाराष्ट्र एआय रेडी' मोहिमेची घोषणा

नांदेड (Maharashtra AI-Ready) : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या वतीने गेल्या २५ वर्षांत १.७ कोटींहून अधिक नागरिकांना डिजिटल साक्षर करणाऱ्या 'एमएस-सीआयटी' अभ्यासक्रमाला  डिजिटल साक्षरता श्रेणीमध्ये देशातील अत्यंत मानाचा 'स्कॉच अवॉर्ड' प्राप्त झाला आहे. एमकेसीएलच्या रौप्यमहोत्सवी वर्षात मिळालेला हा बहुमान महाराष्ट्राच्या डिजिटल शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे. डिजिटल परिवर्तन, कौशल्य विकास आणि नागरिक सक्षमीकरण क्षेत्रातील हा देशातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.

या (Maharashtra AI-Ready) सन्मानाबद्दल एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांचे अभिनंदन करत हा पुरस्कार विद्यार्थी, एमएसबीटीई, महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण एमकेसीएल परिवाराच्या संयुक्त प्रयत्नांचे यश आहे.त्यामुळे आपल्या जवळच्या एमएस-सीआयटी सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होऊन मोफत एआय मास्टरक्लासचा लाभ घ्यावा,असे आवाहन एमकेसीएलचे विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.

​या पत्रकार परिषदेला अलोक मालू, जिल्हा सल्लागार पंडिरानाथ आघाव हे उपस्थित होते.पुढे बोलताना महेश पत्रिके म्हणाले की, या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून एमकेसीएलने "आपण करूया महाराष्ट्र एआय रेडी" ही राज्यव्यापी जनजागृती मोहीम २३ जून २०२६ पासून सुरू केली आहे. या ६० दिवसांच्या मोहिमेअंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि विविध भागांमध्ये एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) विषयी जनजागृती केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत www.mscit.ai या संकेतस्थळावर नोंदणी करून ६० मिनिटांचा मोफत 'एआय मास्टरक्लास' विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासकीय कर्मचारी आणि व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा मास्टरक्लास पूर्ण करणाऱ्यांना एमएस-सीआयटी केंद्रातर्फे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.​

बदलत्या काळानुसार नवीन (Maharashtra AI-Ready) एआय-सक्षम एमएस-सीआयटी अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सेक्युरिटी, डेटा लिटरेसी आणि क्लाउड कम्प्युटिंग यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना चॅटजीपीटी, मायक्रोसॉफ्ट कोपायलट, गुगल जेमिनी, कॅनव्हा एआय यांसह १२५ हून अधिक एआय टूल्स आणि २५० पेक्षा अधिक आधुनिक डिजिटल कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जात आहे. तसेच 'ईरा क्रांती एआय चॅटबॉट'मुळे विद्यार्थ्यांना शिकतानाच त्वरित शंका निरसनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच 'सीसीटीपी' अभ्यासक्रमाद्वारे इंग्रजी, मराठी व हिंदी टायपिंगचे शासकीय मान्यताप्राप्त प्रशिक्षणही उपलब्ध आहे.

कौशल्य विकासासाठी एमकेसीएल अंतर्गत २६५ हून अधिक  (KLiC) कोर्सेस उपलब्ध असून, टॅली विथ जीएसटी, ॲडव्हान्स एक्सल, ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आयटी हार्डवेअर आणि नेटवर्किंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. १२० तासांचे Klic कोर्सेस पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमकेसीएल प्रमाणपत्रासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची मान्यताप्राप्त गुणपत्रिका दिली जाते. तसेच कोणतेही तीन klic कोर्सेस पूर्ण करणाऱ्यांना 'klic डिप्लोमा' प्रदान केला जाणार असल्याचे पत्रिके यांनी सांगितले.