Latur Water Supply: 'एल निनो'च्या प्रभावामुळे लातूरमध्ये पाण्याच्या पुरवठ्यात कमीपणाचे डावले आहे. जिल्हाधिकारी यांनी पाणीचा आढावा घेतला आणि सर्व पाणी पिण्यासाठीच राखवायचे निती मांडले.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या सूचना; पाणीसाठ्याचा घेतला आढावा
लातूर (Latur Water Supply) : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरणाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला असून, राज्य शासनाच्या आदेशानुसार धरणातील सर्व पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 'एल निनो'च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रकल्पांमधील (Latur Water Supply) पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने निर्गमित केले आहेत. या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले. तसेच, धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर नियमानुसार तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी (Latur Water Supply) 'अमृत २.०' योजनेअंतर्गत मांजरा धरण परिसरात नवीन जॅकवेल उभारण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. या पाहणी दौऱ्यावेळी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील आणि लातूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे इतर अधिकारी उपस्थित होते.