Shinde Shiv Sena: लातूर जिल्ह्यात शिवसेनेत कार्यकर्त्यांना बरखास्यात आलेल्या अफव्याच्या नकार्याने खळबळ पसरली. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली पदाधिकारींचा वाद-वादल,
जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा मेसेज व्हायरल; सर्वत्र खळबळ!
लातूर (Shinde Shiv Sena) : लातूर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत संघटनात्मक दृष्ट्या मोठी धूसफूस चव्हाट्यावर आली असून जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्तीच्या एका नाट्यमय अफवेमुळे पक्षात पदांसाठी मोठी ओढाताण सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका महिला पदाधिकाऱ्याच्या संदेशामुळे जिल्हाभरातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असली तरी लातूर लोकसभा संपर्कप्रमुखांच्या स्पष्टीकरणानंतर ही खळबळ अखेर खळखळ असल्याचे स्पष्ट झाले.
लातूर महानगरपालिका निवडणुकीपासून एकनाथ शिंदे यांच्या (Shinde Shiv Sena) शिवसेनेत जिल्ह्यातून विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणावर पक्षात स्वागत केले जात आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पक्षाचे मुख्य सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सर्वत्र एस आय आर सुरू असल्याने बूथस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत पक्षाची यंत्रणा मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. अशातच लातूर जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त केल्याचा संदेश व्हायरल झाल्याने पक्षात सर्वत्र खळबळ उडाली. यामागे पक्षातील जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांचा वाद असल्याची रंजक चर्चा होऊ लागली. याबाबत लातूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांशी संपर्क साधून वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेण्यासाठी प्रतिसाद मिळाला नाही.
सध्या 'एसआयआर मतदार मोहीम' यशस्वी करण्यावरच सर्वच राजकीय पक्षांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. अर्थात शिवसेनेनेही याच कामावर लक्ष केंद्रित केले असताना कार्यकारिणी बरखास्तीची 'हूल'आल्याने पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र सध्यातरी लातूर जिल्ह्यातील शिवसेनेत दिसत आहे. दरम्यान याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख आमदार मंगेश कुडाळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
पदांसाठी काहीजणांचा बालहट्ट?
गेल्या काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत (Shinde Shiv Sena) प्रवेश केला. त्यानंतर लातूर जिल्ह्याची जिल्हाप्रमुखपदे देण्यावरून पक्षांमध्ये खलबते सुरू झाली. काहींनी आपल्याच गटाला जिल्हाप्रमुखपद मिळावे, यासाठी तर काहींनी जिल्ह्याचा सर्व कारभार आपल्याकडेच द्यावा, असा बालहट्ट धरल्याची चर्चा यामुळे जोरदार सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्वच कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची सोशल मीडियावरील व्हायरल अफवा आल्याने अधिक चर्चा सुरू झाली. याबाबत सर्वसामान्य शिवसैनिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.