Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > महाराष्ट्र

लातुरात अनुसूचित जाती विभाग

संविधान रक्षणासाठी ५९ जातींनो, एकत्र या: डॉ. वनकर

Latur SC Vibhag: काँग्रेसचे लातूर कमिटी नेतृत्वात डॉ. वनकर यांच्याद्वारे संविधान रक्षणासाठी ५९ अनुसूचित जातींना येण्याचे आवाहन केले.


संविधान रक्षणासाठी ५९ जातींनो एकत्र या डॉ वनकर

Latur SC Vibhag |

 

लातुरात अनुसूचित जाती विभाग बैठकीत सत्कार सोहळा

लातूर (Latur SC Vibhag) : भारताच्या संविधानाचे रक्षण करायचे असेल तर काँग्रेस पक्षाला सत्तेत आणावे लागेल. आणि काँग्रेस पक्षाला सत्तेत आणायचे असेल तर अनुसूचित जातीतील 59 जातींनो, एकत्र या, अशी हाक हकाँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी येथे दिली. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांची संयुक्त व महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (२१ जून) काँग्रेस भवनात पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. 

या  (Latur SC Vibhag) बैठकीच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके तर व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रविण सूर्यवंशी, मनपा सदस्य असिफ बागवान, सहदेव मस्के, मधुकर एकुगेकर, संजय ओव्हाळ उपस्थित होते. ते म्हणाले, "सध्याची लढाई ही मनुस्मृतीच्या प्रवृत्तीशी असून संविधानाच्या रक्षणासाठी आहे. सर्वसामान्य माणूस, महिला आणि शोषित वर्गाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार फक्त संविधानाने दिला आहे. त्यामुळे संविधान हा आपला प्राणवायू आहे. या देशात राहुल गांधी हे संविधानाच्या रक्षणासाठी एकाकी झुंज देत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व ५९ जातींनी आणि अठरापगड जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे."

महापौर जयश्री सोनकांबळे, प्रदेश सचिव डॉ. दिनेश नवगीरे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. शिवाजी जवळगेकर व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांनीही बैठकीला संबोधित केले. प्रास्ताविक अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले तर सूत्रसंचलन नारायण कांबळे यांनी पार पाडले.

 या (Latur SC Vibhag) कार्यक्रमांमध्ये नगरसेवक विकास सतिश कांबळे, मुकेश गायकवाड, माणिक गायकवाड, महादेव मस्के, बालाजी अंधारे, तात्याराव वाघमारे, नामदेव उपहाडे, नितीन जाधव, अमोल देडे, परमेश्वर शिंदे, शिवाजी कांबळे, डॉ. बालाजी वाघमारे, अनिल दरकसे, दीपक बनसोडे , तानाजी कांबळे, संग्राम नामवाड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग अध्यक्ष ॲड. बाबासाहेब गायकवाड आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनु. जाती विभाग अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

लातूर जिल्ह्यात मजबूत जाळे निर्माण करण्याचा संकल्प!

डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या रूपाने एका खऱ्या आंबेडकरवादी आणि लढाऊ योद्ध्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याची भावना जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, स्वतः अनुसूचित जाती प्रवर्गातील असलेल्या प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांची लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने समाजाला पक्षात एक अत्यंत महत्त्वाचे व सन्मानाचे स्थान मिळाल्याची कृतज्ञता यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related to this topic: