BJP-Mahayuti Elgar: लातूर शहर महानगर पालिका सर्वसाधारण सभेत झालेला गोंधळ व ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारक स्थळावरुन निर्माण झालेला वाद या पार्श्वभूमीवर भाजपा व महायुती
एखाद्याला 'कन्विन्स' करु शकलो नाही, तर 'कन्फ्यूज' करण्याचे राजकारण: चाकूरकर
लातूर (BJP-Mahayuti Elgar) : एखाद्याला 'कन्विन्स' करु शकलो नाही, तर 'कन्फ्यूज' करण्याचे राजकारण केले जात आहे. काँग्रेसच्या महापौर व शिष्टमंडळाच्या देवघरवर शैलेश पाटील चाकूरकर यांच्या भेटीवर बोलताना डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी काँग्रेसवर हा आरोप केला. लातूर शहर महानगर पालिका सर्वसाधारण सभेत झालेला गोंधळ व ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारक स्थळावरुन निर्माण झालेला वाद या पार्श्वभूमीवर भाजपा व महायुतीच्या वतीने गुरुवारी (दि.6) गांधी चौकात झालेल्या काँग्रेस विरोधी निदर्शनात चाकूरकर बोलत होत्या.
डॉ. चाकूरकर म्हणाल्या की, चाकूरकर साहेब हे फक्त चाकूरकर परिवाराचे नाहीत तर ते तुम्हा आम्हा सर्व लातूरकरांचे आहेत. त्यांनी दिलेले योगदान राष्ट्रीय आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका निवडणुकी वेळी चाकूरकरांच्या स्मारकासाठी जी घोषणा केली, त्याप्रमाणे चाकूरकर साहेबांचे स्मारक लातूर शहर महानगर पालिकेच्या आवारतच व्हावे. यासाठी मनपातील सर्व सहकार्यानी विषय लावून धरावा, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या पक्षासाठी चाकूरकरांनी सर्व आयुष्य वेचले, त्या पक्षाचे मित्र या विषयात सोबत नाहीत, याची मनाला खंत वाटते, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी या (BJP-Mahayuti Elgar) निदर्शने आंदोलनात भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, अॅड. व्यंकट बेद्रे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, भाजपा गटनेते दीपक मठपती, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, अॅड.शैलेश गोजमगुंडे, महामंत्री प्रवीण कस्तुरे, संजय गिर, प्रमोद गुडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, प्रशांत पाटील, नगरसेविका रागिणीताई यादव, नगरसेवक रविशंकर जाधव, गिरीश पाटील, शोभाताई पाटील, अनंत गायकवाड, भिमाशंकर बेंबळकर, स्वाती घोरपडे, प्रेरणाताई होनराव, करुणाताई शिंदे, गणेश गवारे, आदिती पाटील, उद्धव तेलंगे, शितल मालू, विनय जाकते, राजश्री धोत्रे, संगिता मिरचे, सत्यवती चेवले, ज्योती आवस्कर, जयश्री बाहेती, मंडल अध्यक्ष राहुल भुतडा, सुरेश जाधव, रोहित पाटील, गोपाळ वांगे, दिग्विजय काथवटे,नितीन कोरे,झुंजे पाटील,भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष ओम धरणे, कामगार मोर्चा अध्यक्ष ज्योतीराम चिवडे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष पवन आल्टे, किशोर शिंदे, दत्ता चेवले, संतोष तिवारी, राजेश पवार, पांडुरंग बोडके, शशिकांत हांडे, सिमा करपे, सचिन जाधव, आफ्रिन खान आदींनी सहभाग नोंदविला.
काँग्रेसकडून संकुचित राजकारण - अॅड. व्यंकट बेद्रे
काँग्रेस लोकभावनेपासून पूर्णपणे दुरावली आहे. लातूरचा सुवर्णकाळ चाकूरकर आणि विलासराव देशमुख यांच्या काळात होता. आज मात्र त्यांच्या नावावर राजकारण करून शहराचा विकास खुंटवला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे पुतळा महानगरपालिका परिसरात उभारण्याची घोषणा केली असतानाही काँग्रेसकडून संकुचित राजकारण सुरू आहे. हे तात्काळ थांबवावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते अॅड.व्यंकट बेद्रे यांनी यावेळी बोलताना दिली.