Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > महाराष्ट्र

परभणी जि.प.मध्ये भाजपा व राष्ट्रवादीचे सत्ता समिकर

परभणीत अध्यक्षपदी लता वाकळे तर उपाध्यक्षपदी श्रीकांत विटेकर

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत भाजपाकडून लता विजयकुमार वाकळे तर राष्ट्रवादीकडून श्रीकांत उत्तमराव (भोसले) विटेकर यांचे उमेदवारी अर्ज आले.


परभणीत अध्यक्षपदी लता वाकळे तर उपाध्यक्षपदी श्रीकांत विटेकर 

(Parbhani Zilla Parishad) |

शिवसेनेचा बहिष्कार

परभणी (Parbhani Zilla Parishad) : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत भाजपाकडून लता विजयकुमार वाकळे तर राष्ट्रवादीकडून श्रीकांत उत्तमराव (भोसले) विटेकर यांचे उमेदवारी अर्ज आले. विरोधामध्ये एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. शिवसेनेने या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

परभणी जिल्हा परिषद (Parbhani Zilla Parishad) अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीचे गुर्‍हाळ मागील २० दिवसापासून चालू आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, उबाठा व काँग्रेस एकत्र येऊन जिल्हा परिषद वर सत्ता स्थापन करणार होते, मागील पंधरा दिवसापासून हे सर्वजण मुंबई येथे थांबले होते. वरिष्ठ नेत्यांमध्ये देखील परभणी जि. प.सत्ता स्थापने संदर्भात भाजपाला सोडून एकत्र येणार यावर देखील चर्चा झाली. त्यामुळे सत्तेपासून भाजप दूर राहील असे वाटत होते.

परंतु मागील तीन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचे समीकरण जुळविले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सोबत घेऊन महायुतीची सत्ता परभणीत स्थापन होणार, असे मुंबईवरून सांगितले. त्यानंतर राजकीय हालचालींना वेगळेच वळण लागले. मुंबईवरून सर्वजण परत आल्यावर भाजप व राष्ट्रवादी फक्त स्थापन करणार, असे चित्र स्पष्ट झाल्यावर शिवसेना, उबाठा व काँग्रेस यांनी निवड प्रक्रियेतून बाजूला राहण्याचे पसंत केले. बुधवार १८ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरताना भाजपाच्या लता विजयकुमार वाकळे व राष्ट्रवादीचे श्रीकांत उत्तमराव भोसले विटेकर या दोघांनीच नामनिर्देशन दाखल केले. त्यानंतर कोणाचाही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.

जिल्हा परिषद पक्षीय बलाबल 
जिल्हा परिषद मध्ये भाजपाच्या २४, राष्ट्रवादी १५, उबाठा ६, शिवसेना ५, काँग्रेस ३, अपक्ष १ अशी सदस्य संख्या आहे. यामध्ये आता भाजपा व राष्ट्रवादी एकत्र आल्याने संख्याबळ ३९ वर गेले आहे.


 विरोधी पक्षात राहू - अजित वरपूडकर 
जिल्हा परिषद (Parbhani Zilla Parishad) अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी मध्ये भाजपासोबत आम्ही जाणार नाही. संख्याबळ जुळत नसल्यामुळे आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. येणार्‍या काळात विरोधी पक्ष म्हणून काम करून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गटनेते अजित वरपूडकर यांनी दिली.

राष्ट्रवादीने खंजीर खुपसला - आनंद जाधव, शिवसेना संपर्क प्रमुख

आमची राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापनेसाठी बोलणी झाली होती. उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपद देण्याचे ठरले होते. परंतु ऐनवेळी राष्ट्रवादीने भाजपासोबत युती करून पाठीत खंजीर खुपसला. तसेच भाजपनेही विश्वासात घेतले नाही.त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवर बहिष्कार टाकत आहोत.


धोका झालाय - पांडुरंग खिल्लारे 
 मागील पंधरा दिवसापासून राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न केले, परंतु ऐनवेळी राष्ट्रवादीने धोका दिल्याने सत्तेत आम्ही बसू शकलो नाही. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षात राहून काम करू अशी प्रतिक्रिया उबाठाचे गटनेते पांडुरंग खिल्लारे यांनी दिली.

Related to this topic: