किडनी पीडित शेतकरी

सावकारी पाशात अडकलेल्या किडनी पीडित शेतकरी रोशन कुळे याला अखेर पाच लाखाची मदत 

Chief Minister Relief Fund: चंद्रपूरच्या रोशन कुळे यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून दिलासा मिळाला, ज्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी 5 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली.

सावकारी पाशात अडकलेल्या किडनी पीडित शेतकरी रोशन कुळे याला अखेर पाच लाखाची मदत 

Chief Minister Relief Fund

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्री सहायता निधी मंजूर 

चंद्रपूर (Chief Minister Relief Fund) : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रोशन शिवदास कुळे यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक संकटाला अखेर दिलासा मिळाला आहे. सावकारीच्या जाचामुळे आणि कर्जाच्या विळख्यात अडकून किडणी विक्रीसारख्या अत्यंत वेदनादायी घटनेला सामोरे जावे लागलेल्या रोशन कुळे यांच्या मदतीसाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री सहायता निधीतून (Chief Minister Relief Fund) ५ लक्ष रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

रोशन शिवदास कुळे यांची सावकारी कर्जामुळे आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यांच्या शेतजमिनी सावकारांकडे गहाण असल्याने संपूर्ण कुटुंब अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर रोशन कुळे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात येत आपली कैफियत मांडली होती. त्यांच्या कुटुंबाची व्यथा ऐकल्यानंतर आ. मुनगंटीवार यांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करत या प्रकरणात मदत देण्याची आग्रही मागणी केली होती.

यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लक्ष रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी शासनाकडे अधिकृत पत्रव्यवहार करत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित विभागांशी समन्वय साधत हे प्रकरण संवेदनशीलतेने मांडले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लक्ष रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला. या मदतीमुळे संकटाच्या अंधारात सापडलेल्या कुळे कुटुंबाला मोठा मानसिक आणि आर्थिक आधार मिळाला आहे. अनेक दिवसांपासून सावकारीच्या जाचाने, कर्जाच्या ओझ्याने आणि भविष्यातील चिंतेने खचलेल्या या कुटुंबासाठी ही मदत म्हणजे नव्या आशेचा किरण ठरली आहे.

‘आमच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि वेदनादायी काळात आमचे दुःख समजून घेत मदतीसाठी धावून येणारे नेतृत्व म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) त्यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला,’ अशा शब्दांत कुळे कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त करत आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे. दरम्यान, येत्या १९ तारखेला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रोशन कुळे यांना ५ लक्ष रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणात संवेदनशील भूमिका घेत विशेष (Chief Minister Relief Fund) मदत मंजूर केल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

संबंधित सामग्री

हिवाळी अधिवेशनाच्या मुदतीवरून सुधीर मुनगंटीवार आक्रमक; फडणवीसांसमोरच म्हणाले, 'इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट नको!'

हिवाळी अधिवेशनाच्या मुदतीवरून सुधीर मुनगंटीवार आक्रमक; फडणवीसांसमोरच म्हणाले, 'इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट नको!'

हिवाळी अधिवेशनाच्या मुदतीवरून सुधीर मुनगंटीवार आक्रमक; फडणवीसांसमोर तीन आठवड्यांच्या अधिवेशनाची मागणी.

Nov 18, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 292 कोटींची मदत मंजूर

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 292 कोटींची मदत मंजूर

Flood-Affected Farmers Financial Aid: राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 291कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Nov 05, 2026
‘मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मालक नाहीत’; संजय राऊतांचा सरकारवर चौफेर हल्लाबोल

‘मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मालक नाहीत’; संजय राऊतांचा सरकारवर चौफेर हल्लाबोल

संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; शेतकरी, ठाणे प्रकरण, ५०० कोटींची कथित ऑडिओ क्लिप आणि २,६३७ झाडांच्या मुद्द्यावरून सवाल.

Oct 28, 2026
लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या विद्यार्थिनींना पैसे! वर्षाला ६ हजार रुपये मिळणार; नवी योजना सुरू

लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या विद्यार्थिनींना पैसे! वर्षाला ६ हजार रुपये मिळणार; नवी योजना सुरू

उल्हासनगरमध्ये ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू. सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला ६ हजार रुपये मिळणार. १९ हजार नोंदणी; उद्घाटनाला भाजपची गैरहजेरी चर्चेत.

Oct 27, 2026
सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा धुमाकूळ; भेंडाळा येथील शेतकरी महिलेचा मृत्यू

सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा धुमाकूळ; भेंडाळा येथील शेतकरी महिलेचा मृत्यू

खातगाव–लाडबोरी शिवारात वाघाच्या हल्ल्यात भेंडाळा येथील प्रेमिला महाडोरे यांचा मृत्यू; दोन दिवसांत सिंदेवाही परिसरात दोन घटना.

Oct 26, 2026