Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात तपास वेगात

‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; ७ दिवसांची पोलीस कोठडी

Ashok Kharat : स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ “कॅप्टन” याच्याविरोधात दाखल झालेल्या बलात्कार, लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगच्या गंभीर प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे.


 ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे ७ दिवसांची पोलीस कोठडी

Ashok Kharat |

नाशिक (Ashok Kharat) : स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ “कॅप्टन” याच्याविरोधात दाखल झालेल्या बलात्कार, लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगच्या गंभीर प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता पोलिसांकडून बहुआयामी तपास सुरू करण्यात आला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत अशोक खरात (Ashok Kharat) हा भविष्य सांगण्याच्या बहाण्याने लोकांचा विश्वास संपादन करत असल्याचे नमूद केले आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर गुंगीकारक पदार्थ देऊन त्यांच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या निवासस्थानासह इतर ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत एक पेनड्राईव्ह जप्त करण्यात आली असून त्यामध्ये ५० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती पुढे आली आहे. या व्हिडिओंच्या आधारे महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून आर्थिक व इतर प्रकारचे फायदे घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित व्हिडिओंची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अशोक खरात प्रकरणात छापेमारीत पेनड्राईव्ह जप्त

तसेच, या प्रकरणात अघोरी प्रथा, तांत्रिक विधी आणि अंधश्रद्धेचा आधार घेत महिलांची फसवणूक केल्याचा आरोपही समोर येत आहे. आरोपी स्वतःला प्रभावशाली व्यक्ती म्हणून सादर करून पीडितांवर मानसिक दबाव टाकत असल्याचेही तपासातून उघड होत आहे. दरम्यान, आरोपीचे काही राजकीय, प्रशासकीय तसेच प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिक संवेदनशील व गंभीर वळण मिळाले असून तपास यंत्रणांवर सत्य समोर आणण्याचा मोठा दबाव आहे.

Related to this topic: