Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > महाराष्ट्र

भारत व्हिस्की-रम

आता बदलणार लोकप्रिय व्हिस्की-रमची 'चव'; कृत्रिम स्वादाला लागणार ब्रेक

India Whiskey-Rum: भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने आक्षेप घेतल्यानंतर मद्यनिर्मिती क्षेत्रातील डियाजिओ कंपनीने आपल्या काही उत्पादनांच्या सूत्रामध्ये बदल करण्याचे मान्य केले आहे.


आता बदलणार लोकप्रिय व्हिस्की-रमची चव कृत्रिम स्वादाला लागणार ब्रेक

India Whiskey-Rum |

 

कृत्रिम स्वाद काढून नवी निर्मिती प्रक्रिया

नवी दिल्ली (India Whiskey-Rum) : भारतात विकल्या जाणाऱ्या काही लोकप्रिय व्हिस्की आणि रमची चव लवकरच बदलण्याची शक्यता आहे. भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने आक्षेप घेतल्यानंतर मद्यनिर्मिती क्षेत्रातील डियाजिओ कंपनीने आपल्या काही उत्पादनांच्या सूत्रामध्ये बदल करण्याचे मान्य केले आहे. अँटिक्विटी ब्ल्यू, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि मॅकडॉवेल्स नंबर वन सेलिब्रेशन मॅच्युअर्ड XXX रम या लोकप्रिय उत्पादनांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. या (India Whiskey-Rum) मद्यांमध्ये व्हिस्कीचा स्वाद किंवा रमचा स्वाद स्वतंत्रपणे मिसळला जात असल्याचे तपासणीत आढळले होते. ही पद्धत निर्धारित मानकांशी सुसंगत नसल्याचे प्राधिकरणाने म्हटले होते.

मद्याला नैसर्गिक चव आणि सुगंध मिळण्यासाठी मळी, माल्ट किंवा अन्य मूलभूत घटकांचा वापर करून परिपक्वता प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. त्याऐवजी स्वादरहित तटस्थ मद्यामध्ये बाहेरून कृत्रिम किंवा नैसर्गिकसदृश स्वाद मिसळणे दिशाभूल करणारे असल्याची भूमिका प्राधिकरणाने घेतली. डियाजिओने आता (India Whiskey-Rum) वादग्रस्त स्वादद्रव्यांचा वापर बंद करण्याचे मान्य केले आहे. बदल केवळ कारवाई झालेल्या राज्यांपुरते मर्यादित न राहता देशभरातील सर्व उत्पादन प्रकल्पांत लागू करण्यात येतील. सुधारित उत्पादने बाजारात येईपर्यंत बाटलीच्या दर्शनी भागावर मिसळलेल्या स्वादाची स्पष्ट माहिती देण्यात येणार आहे.