Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > महाराष्ट्र

हिंगोली उर्दू घर

हिंगोलीत 'उर्दू घर' उभारण्याची मागणी; माजी नगरसेवक जावेद राज यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदन

Hingoli Urdu House: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची भेट घेऊन हिंगोली शहरात उर्दू घर उभारण्यासाठी निवेदन सादर केले.


हिंगोलीत उर्दू घर उभारण्याची मागणी माजी नगरसेवक जावेद राज यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदन

Hingoli Urdu House |

हिंगोली (Hingoli Urdu House) : हिंगोली शहरातील उर्दू भाषिक समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी माजी नगरसेवक जावेद राज यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची भेट घेऊन हिंगोली शहरात 'उर्दू घर' (Hingoli Urdu House )उभारण्यासाठी निवेदन सादर केले.

हिंगोली हा अल्पसंख्याक बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र येथे अद्याप उर्दू भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, शायर आणि विविध सामाजिक संस्थांना एकत्र येऊन काम करता यावे, यासाठी हिंगोलीत 'उर्दू घर' (Hingoli Urdu House) असणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी निवेदनाची दखल घेतली असून या विषयावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. हिंगोली शहराला लवकरात लवकर "उर्दू घर" मंजूर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. जावेद राज यांनी सांगितले की, हिंगोलीच्या सर्व समाजघटकांच्या विकासासाठी त्यांचे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील.

Related to this topic: