Hingoli Police Medal: भारत सरकार गृह मंत्रालयाने पोलिस दलातील अधिकारी व अमलदारांच्या दिर्घकालीन, निष्कलंक सेवेची दखल घेण्यासाठी उत्कृष्ट सेवापदक आणि अति उत्कृष्ट सेवा पद जाहीर करण्यात आले
हिंगोली (Hingoli Police Medal) : भारत सरकार गृह मंत्रालयाने पोलिस दलातील अधिकारी व अमलदारांच्या दिर्घकालीन, निष्कलंक सेवेची दखल घेण्यासाठी उत्कृष्ट सेवापदक आणि अति उत्कृष्ट सेवा पद जाहीर करण्यात आले असुन १५ ऑगस्ट रोजी उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल जिल्ह्यातील १२ पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना प्रदान (Hingoli Police Medal) करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट व अति उत्कृष्ट सेवा पदकात हिंगोली जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन बालासाहेब भोसले, पोलिस निरीक्षक दत्ता गोविंदराव केंद्रे, हिंगोली शहर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक साहेबराव मस्के, स्थागु शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माधव एकनाथ जिव्हारे, पोलिस अधिक्षक कार्यालय वाचक शाखेचे पोउपनि परसराम तुकाराम कुरूडे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत शंकरराव माखणे यांच्यासह स्थागु शाखेतील विक्रम गोविंदराव कुंदनानी, प्रेमदास परसराम चव्हाण आणि केशव देविदास गारोळे, ज्ञानोबा कुंडलिक सरोदे, सिंधु डिगांबर काळे, इरफान कदीर शेख यांचा समावेश आहे. तर (Hingoli Police Medal) जिल्हा पोलिस दलातून नुकतेच डिजी एसीबी मुंबई येथील नियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब सुर्यकांत घेवारे यांचाही समावेश आहे.