Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > महाराष्ट्र

विदर्भ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल

विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपूरलाच थांबणार .......

गोंदिया स्थानकावरील नूतनीकरण कामांमुळे विदर्भ एक्स्प्रेस मुंबई ते नागपूरपर्यंतच धावणार. ३ मे ते २३ मे या कालावधीत गाडीचे वेळापत्रकात बदल.


विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपूरलाच थांबणार

गोंदिया स्थानकावरील रेल्वे ट्रॅक नूतनीकरणाची कामे सुरू असल्याने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने विदर्भ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल केला आहे. ३ मे ते २३ मे या कालावधीत ही गाडी गोंदियाऐवजी नागपूर-अजनी स्थानकापर्यंतच धावणार आहे.

कसं असेल वेळापत्रक?
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोंदियादरम्यान धावणारी विदर्भ एक्स्प्रेस क्रमांक १२१०५ आता नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर अंतिम थांबा घेणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १२१०६ विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपूर स्थानकावरूनच मुंबईसाठी सुटेल.
गोंदिया स्थानकावर इंटरलॉकिंग, प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि नवीन मार्गांची जोडणी यांसारखी महत्त्वाची कामे सध्या सुरू आहेत. केवळ विदर्भ एक्स्प्रेसच नव्हे, तर अन्य काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले असून काही गाड्यांना दुसरे थांबे देण्यात आले आहेत.

प्रवाशांची मोठी गैरसोय
विदर्भ एक्स्प्रेस तात्पुरती नागपूरपर्यंतच मर्यादित असल्याने गोंदिया, तुमसर आणि भंडारा येथील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. नागपूर-गोंदिया मार्गावर प्रवाशांसह व्यापारी, कामगार, शेतकरी आणि मालवाहतूकही अवलंबून असते. या सर्वांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकृत ॲप किंवा वेबसाइट तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. स्थानकावरील कामे पूर्ण होताच विदर्भ एक्स्प्रेस पुन्हा पूर्ववत गोंदियापर्यंत धावू लागेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related to this topic: