Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > महाराष्ट्र

आ. संतोष बांगर

शक्तीपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध; मोजणी प्रक्रिया पाडली बंद

MLA Santosh Bangar: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेतकर्यांनी शक्तिपीठ महामार्गावरील कंपनी कर्मचारियोंच्या मोजणी प्रक्रियाला विरोध केला. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पथक


शक्तीपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध मोजणी प्रक्रिया पाडली बंद

MLA Santosh Bangar |

 

आ. संतोष बांगर शेतकर्‍यांसह उतरले रस्त्यावर; मोजणी करण्यास आलेल्या पथकाला पाठवले परत

आखाडा बाळापूर (MLA Santosh Bangar) : हिंगोली जिल्ह्यातून जाणार्‍या शक्तीपीठ महामार्गाला कळमनुरी तालुक्यातील शेतकर्‍यांतून प्रखर विरोध होत आहे आज प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार्‍या बऊर,कांडली भागात कंपनी व महसूल अधिकारी पथक मोजणी करता आले असता संतप्त शेतकर्‍यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत मोजणी रोखून धरली घटनास्थळी आमदार संतोष बांगर तातडीने दाखल झाले त्यांनी शेतकर्‍यांसोबत ठामपणे उभे असल्याचे सांगून पिढ्यांन पिढ्या शेती करणारे अल्पभूधारक शेतकर्‍यांनी जमिनी गेल्यावर खायाचे काय ? पैसा कीती दिवस पुरणार? असा सवाल करत शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविला व पथकाला परत जाण्यास सांगितले.

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकर्‍यांचा विरोध वरचेवर वाढत आहे आज बऊर,कांडली भागात कंपनी अधिकारी कर्मचारी बरोबर मंडळ अधिकारी किरण पावडे, ग्राम महसूल अधिकारी प्रतीक सोनवणे, भुमि अभी लेख विभाग कर्मचारी इतर कर्मचारी मोजणी करता आले होते यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले त्यांनी मोजणीस प्रखर विरोध दर्शविला व आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना धारेवर धरले सदर बाब शेतकर्‍यांनी आ.संतोष बांगर यांना सांगितल्यावर ते तात्काळ घटनास्थळी आले त्यांनी मोजणी आलेल्या पथकाला मोजणी थांबवून परत जाण्यास सांगितले यावेळी शक्तीपीठ महामार्गात जमीन जाणार्‍या विविध भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. यावेळी आ.संतोष बांगर यांनी आपण व वसमत आ. राजुभैया नवघरे यांनी सभागृहात आपल्या भागातून जाणार्‍या शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आवाज उठवला आहे यापुढे शासनस्तरावर यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

 घटनास्थळी सुरुवातीस थोडे पोलिस कर्मचारी उपस्थित होते नंतर परीस्थिती तापत असल्याचे दिसून येताच पोलिस कर्मचारी मोठ्या प्रमाणात हजर झाले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, गजानन राठोड, सिताराम मस्के, प्रशांत शिंदे, पिराजी बेले, बालाजी जोगदंड,सुनील रिठे, वामन हिरवे,सागर वाढोणकर, गणपत काळे, शाम माने पोलिस पथक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पोलिसांचा कडक बंदोबस्त असुनही शेतकरी संतप्त
 शक्तीपीठ महामार्गाला कळमनुरी तालुक्यातून प्रखर विरोध होत आहे. आमदार संतोष बांगर हे शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरल्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे गुरूवारी मोजणी करण्याकरीता आलेल्या पथकासोबत पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. परंतु शेतकर्‍यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यामुळे पथकाला मोजणी न करता परतपावली जावे लागले.

Related to this topic: