CJP Abhijit Deepke: देशपातळीवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिपके यांची कडोळी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यासाठी जात असताना गोरेगाव येथे रस्त्यावरच अनोखी
हिंगोली (CJP Abhijit Deepke) : देशपातळीवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिपके (CJP Abhijit Deepke) यांची कडोळी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यासाठी जात असताना गोरेगाव येथे रस्त्यावरच अनोखी भेट झाली. छोट्याशा मुलांनी गाडी थांबवून अभिजीत दिपके यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सप्रेम भेट दिला. या भेटीच्या वेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे आणि जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी
अत्यंत शांत, संयमी आणि प्रामाणिक स्वभावाचे अभिजीत दिपके (CJP Abhijit Deepke) यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रश्न स्वतः हाती घेतले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सुविधा आणि समान संधी मिळावी यासाठी ते देशपातळीवर आवाज उठवत आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नव्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवण्याचा त्यांचा संकल्प आहे.
संघटनेचा पाठिंबा
या परिवर्तनाच्या लढ्यात क्रांतिकारी शेतकरी संघटना अभिजीत दिपके (CJP Abhijit Deepke) यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहील, असे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. "विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, शिक्षणाच्या भविष्यासाठी अन्यायाविरुद्धची ही लढाई आता थांबणार नाही," अशी ग्वाही यावेळी अभिजीत दिपके (CJP Abhijit Deepke) यांनी दिली.