MLA Sanjay Gaikwad: आम्ही सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहोत. सत्तेपेक्षा जनतेचा विश्वास आमच्यासाठी मोठा आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, विकासकामे करणे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी...
चिखलीत शिवसेनेचा अभूतपूर्व रोड शो, पक्षप्रवेश व स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप..
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : आम्ही सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहोत. सत्तेपेक्षा जनतेचा विश्वास आमच्यासाठी मोठा आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, विकासकामे करणे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे हीच शिवसेनेची खरी परंपरा आहे.. असे प्रतिपादन आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केले.
शनिवार १५ आगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मौनीबाबा संस्थान चिखली येथे आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळा, जंगी रोड शो, पक्षप्रवेश सोहळा आणि विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी आ. संजय गायकवाड बोलत होते. तत्पूर्वी चिखली शहरातून कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात ढोल-ताशांचा गजर करत, फटाक्यांची आतषबाजी, क्रेनच्या सहाय्याने करण्यात आलेली भव्य पुष्पवृष्टी, भगवे झेंडे आणि युवकांचा उत्स्फूर्त जल्लोष.. असा भव्य-दिव्य रोडशो निघाला होता.
यावेळी बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी सांगितले की, चिखली मतदार संघात शिवसेनेची ताकद अधिक वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्यात आणि प्रत्येक समाजघटकापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचविण्यासाठी आपण स्वतः गावोगावी फिरणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. युवकांमधील उत्स्फूर्त सहभागाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, आजचा युवक विकास, नेतृत्व आणि संघर्ष करणाऱ्या विचारांबरोबर उभा राहत आहे. मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली युवकांमध्ये निर्माण झालेली ऊर्जा आणि जनसंपर्काची ताकद भविष्यात चिखली मतदारसंघातील शिवसेनेला अधिक बळ देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मृत्युंजय गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त चिखलीकरांनी दिलेले प्रेम, आशीर्वाद आणि अभूतपूर्व प्रतिसाद आयुष्यभर विसरणार नाही. हा सन्मान माझा नसून प्रत्येक शिवसैनिकाचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे. आपण दाखविलेला विश्वास आणि प्रेम यामुळे माझ्यावर जनतेच्या सेवेसाठी अधिक जबाबदारी आली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी मी कायम कटिबद्ध राहीन, असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमातील एक विशेष आकर्षण म्हणजे राहुल शिराळे या युवकाने आपल्या हातावर मृत्युंजय संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांचा चेहऱ्याचा टॅटू गोंदविला होता. या टॅटूचे अनावरण आ. संजय गायकवाड यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपातील आवश्यक स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मंचावर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार, नगराध्यक्ष्य सौ. पुजाताई गायकवाड, धर्मवीर युथ फाउंडेशनचे पृथ्वीराज गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपुत, भास्करराव मोरे, किसानसेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, शिवाजी देशमुख, कल्पनाताई बोधेकर, निलेश गुजर, अर्जुन नेमाडे, संतोषराव वाकडे, मयूर बाहेकर, नितीन राजपूत, ज्ञानेश्वर शेळके, गणेश यंगड, विश्वासराव खंडागळे, गजानन ठेंग यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.