MLA Sanjay Gaikwad: बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची बॅकडेट्समिटमध्ये उद्योग मंत्री उदय सांता यांच्या नेतृत्वात औद्योगिक विकासासाठी हनवतखेड शिवारात १३९ हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी मंजूर
हनवतखेड शिवारातील १४९ हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी मंजूर!
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक आज गुरुवार २ जुलै रोजी संपन्न झाली. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या पुढाकारातून उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या दालनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील एमआयडीसी संदर्भातील विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
मोताळा तालुक्यातील तळणी परिसरात एमआयडीसीसाठी शासनाकडून यापूर्वी २५० एकर जमीन देऊ करण्यात आली होती. मात्र, तळणी येथील ग्रामस्थांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविल्यामुळे सदर जमीन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोताळा तालुक्यातील एमआयडीसीसाठी पर्यायी ठिकाणी सुमारे १०० हेक्टर जमीन तातडीने शोधण्याचे आदेश जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना दिले. तसेच, जमीन निश्चित झाल्यानंतर तत्काळ प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
या बैठकीत बुलढाणा तालुक्यातील औद्योगिक विकासालाही गती देण्यात आली. बुलढाणा तालुक्यातील हनवतखेड शिवारातील १३९ हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे बुलढाणा शहर व परिसरात औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण होण्यास चालना मिळणार असून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच, बुलढाणा एमआयडीसीसाठी दुसऱ्या टप्प्यात २५० ते ३०० एकर अतिरिक्त जमीन मंजूर करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या जमिनीच्या संपादनासाठी तातडीने चॅप्टर ६ अंतर्गत कारवाई करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीला उद्योग विभागाचे मंत्रालयीन अधिकारी सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, एमआयडीसी मुंबई येथील जॉईंट सीईओ अजित कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर पोटे, प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, युवा उद्योजक डॉ. विशाल गणेशराव बाहेकर, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार मोताळा पाटील, स्वीय सहायक संतोष शिंगणे यांच्यासह उद्योग विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार असून, भविष्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.