Alia-Ranbir: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट (Alia-Ranbir) आणि रणबीर कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकण्याची शक्यता आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागात शिवा आणि ईशाच्या भूमिकेत
मुंबई (Alia-Ranbir) : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट (Alia-Ranbir) आणि रणबीर कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकण्याची शक्यता आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागात शिवा आणि ईशाच्या भूमिकेत दोघांनीही प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
रणबीर कपूर सध्या ‘रामायण’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो ‘ब्रह्मास्त्र 2’ च्या कामाला सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या भागातही आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
‘ब्रह्मास्त्र’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक मानला जातो. पहिल्या भागातील काल्पनिक विश्व, शिवाच्या शक्ती आणि भव्य व्हिज्युअल इफेक्ट्समुळे चित्रपटाची मोठी चर्चा झाली होती.
आता ‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये कथा कोणत्या वळणावर जाणार, शिवाच्या शक्तींचा पुढील प्रवास कसा असेल आणि ईशाची भूमिका किती महत्त्वाची असेल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आलिया भट्ट आणि (Alia-Ranbir) रणबीर कपूर यांच्या जोडीची लोकप्रियता पाहता ‘ब्रह्मास्त्र 2’च्या अधिकृत घोषणा आणि पुढील अपडेट्सची चाहत्यांना उत्सुकता आहे.