Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > महाराष्ट्र

भुमिपुजनावरून घमासान

MLA संजय मेश्राम व भाजपाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्यात 'तू तू मै मै' !

Bhoomipujan Vakyudh: उमरेड विधानसभा क्षेत्रात विकास कामांच्या भूमिपूजनावरून MLA संजय मेश्राम व भाजपाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्यात शाब्दिक खटके उडाले.


mla संजय मेश्राम व भाजपाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्यात तू तू मै मै

Bhoomipujan Vakyudh |

भिवापूर (Bhoomipujan Vakyudh) : उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम व भाजपाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्यात विकास कामांचे भूमिपूजन करण्यावरून शनिवारी नऊ मे रोजी अनेक ठिकाणी वाकयुद्ध रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू झाली आहे. 

उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार यांचे शनिवारी ९ मे रोजी विधानसभा क्षेत्रातील तिरखुरा, कराडला, पेंढराबोडी जवराबोडी, कारगाव ,उखळी, मालेवाडा, सायगाव बेसूर ,हिवरा आदी गावांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम होते. संजय मेश्राम हे काँग्रेसचे आहेत तर आनंदराव राऊत हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. (Bhoomipujan Vakyudh) यावेळी  तिरखुरा  कारगाव व पेंढराबोडी या गावातील भूमिपूजना प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा भिवापूर तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष आनंदराव राऊत हे उपस्थित झाल्याने ही बाब संजय मेश्राम यांना खटकली.

आनंदराव राऊत यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सुचवलेले कामे पालकमंत्र्यांनी मंजूर केले तर माझ्या परवानगीशिवाय निधी विधानसभा क्षेत्रात येणार कसा असा सवाल आमदार संजय मेश्राम यांनी उपस्थित केला. याशिवाय (Bhoomipujan Vakyudh) प्रोटोकॉलवरूनही 'तु तु मैं मै' बघायला मिळाली .कारगाव मध्ये भूमिपूजन करताना हि श्रेयवादाची लढाई हातवाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने  उपस्थित नागरिकांनी वाद सोडा अगोदर रस्त्याचे काम लवकर सुरू करा असा उपरोधिक टोलाही लगावला. या वादाचे स्वरूप बघता कारगाव वरून आनंदराव राऊत व त्यांचे कार्यकर्ते हे समोरील भूमिपूजनाचा कार्यक्रम सोडून परत गेले. एकंदरीत दिवसेंदिवस आमदार संजय मेश्राम व भाजपाचे स्थानिक नेते यांचे शाब्दिक खटके उडण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहेत 

Related to this topic: