Breaking News
  • केवळ चाकणकरांवर कारवाई का? खऱ्या सूत्रधारांना का वाचवताय? – नाना पटोलेंचा रोकठोक सवाल
  • राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते हेल्मेट न घालता चार्जिंग स्कूटीवरून कलेक्टर ऑफिसला पोहचले
  • पुण्यातील सर्व VIP, VVIP ची ताफ्यातील वाहने अर्ध्याने कमी करण्यात आली आहेत
  • सोलापूर - अक्कलकोट शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 22 गाड्यांचा ताफा
  • सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे घेतले दर्शन
  • फडणवीसांचा दुचाकी प्रवासाने वेधले लक्ष; शेलार-परब संवादावर मिश्किल व्हिडिओ व्हायरल
  • देवास येथील एका कारखान्यात जोरदार स्फोट झाला असून या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल; मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार जयंत पाटलांना इशारा
  • मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

होम > महाराष्ट्र

“एन्काऊंटर झालं तरच सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांचं” – तरडे

भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना १ मे रोजी घडली होती.


“एन्काऊंटर झालं तरच सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांचं” – तरडे

Bhor Incident |

पुणे (Bhor Incident) : भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना १ मे रोजी घडली होती. या घटनेनंतर भोर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाईबाबत राज्य सरकार आणि पोलिसांकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने शनिवारी रात्री नसरापूर येथील ग्रामस्थांनी संतप्त होत पिडीत मुलीचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले ब्रीजवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक सुमारे चार तास ठप्प झाली होती.

नवले पुलावर चिमुरडीचा मृतदेह ठेवत नातेवाईकांनी तीव्र भूमिका घेतली होती. “जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि आरोपीला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनामुळे तब्बल तीन तास पुण्यात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मयत चिमुरडीच्या वडिलांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, या आश्वासनानंतरही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवले. सुमारे चार तास सुरू असलेले आंदोलन यानंतर संपुष्टात आले आणि वाहतूक हळूहळू सुरळीत होऊ लागली.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. अखेर उशिरा रात्री आंदोलकांना नवले पुलावरून हटवण्यात आले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. दरम्यान, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची चर्चा असली तरी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा कोणत्याही लाठीचार्जचा इन्कार केला आहे. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, आम्ही मृत मुलीच्या आई-वडिलांना समजावून सांगत त्यांना तेथून सुरक्षित बाहेर काढले.

नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभरातून संतप्त आवाज उठू लागले आहेत. विविध ठिकाणी आंदोलन होत असून सोशल मीडियावरही आरोपीला कडकात कडक शिक्षा देण्याची जोरदार मागणी होत आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असली तरी, जोपर्यंत त्याला योग्य ती शिक्षा होत नाही तोपर्यंत त्या चिमुकलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, अशा तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते प्रवीण तरडे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत थेट एन्काऊंटरची मागणी केली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “उद्या त्या नराधमाचे एन्काऊंटर झालं तरच मानू की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहे… अन्यथा भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा.” दरम्यान, त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

नसरापूर येथील या संतापजनक घटनेनंतर उसळलेल्या तीव्र भावना आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अखेर तब्बल 28 तासांनी पीडित चिमुरडीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैकुंठ स्मशानभूमीत मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत हे अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रात्री सुमारे 11.50 वाजण्याच्या सुमारास वडिलांनी चिमुरडीच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्या क्षणी उपस्थित सर्वांच्या भावना अनावर झाल्या आणि स्मशानभूमीत हळहळ व्यक्त करत शोकाकुल वातावरण निर्माण झाले.  हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक अधिक आक्रमक झाले असून तातडीने आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. निषेध म्हणून भोर आणि राजगड तालुका बंदची हाक देण्यात आली असून हा बंद कडकडीत पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पीडितेला न्याय मिळावा यासाठी एकजूट होण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी नातेवाईक आणि नागरिक ठाम भूमिका घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणात बाल हक्क आयोगाच्या भूमिकेबाबतही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Related to this topic: