दरवर्षी १ एप्रिल रोजी फूल डे साजरा केला जातो. बरं, हा सण नाही. पण १ एप्रिलही महत्त्वाची तारीख आहे.
दिनविशेष
नागपूर (April Fools Day) : दरवर्षी १ एप्रिल रोजी फूल डे साजरा केला जातो. बरं, हा सण नाही. पण १ एप्रिलही महत्त्वाची तारीख आहे. मूर्ख बनवायच्या दिवशी, लोक एखाद्याला मूर्ख बनवून आनंदी असतात. दरवर्षी हा दिवस नवीन पद्धतीने साजरा करायलाही लोकांना आवडते.
१ एप्रिल सगळ्यांना फूल अर्थात मूर्ख बनवण्? याचा दिवस. या दिवशी कोणीही कोणालाही मूर्ख बनवतो. येथे वयाची अट नसते. फक्त असते निखळ आनंद लुटण्? याची तयारी. फ्रान्समधून एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात झाली. सोशल मीडियाच्या जमान्यात आजही एप्रिल फूल साजरा केला जातो. छोट्या छोट्या गोष्टींवर एकमेकांना मूर्ख बनवून लोक आनंदी होतात आणि हा दिवस सण म्हणून साजरा करतात. इतकंच नाही तर काही लोक १ एप्रिलची अनेक दिवस आधीच वाट बघायला लागतात. जगभरात या दिवशी लोकं शाळेत, कॉलेज किंवा ऑफिस, घरात एकमेकांना मूर्ख बनवत असतात. त्यासाठी ते विविध पर्याय अवलंबवून लोकांना मूर्ख बनवतात आणि मजा घेतात.
बॉलिवूड चित्रपटांमध्ये एप्रिल फूल नावाचा एकच चित्रपट बनला आहे. यावर एक गाणे देखील आहे, 'अप्रैल फूल बनाया, उनको गुस्सा आया'.१५८२ मध्ये प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश पॉप ग्रेगरी १३ यांनी दिले होते. १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्ष हे सुरू होते. हे मानण्यास अनेक लोकांनी नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नसल्यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली. आता हा दिवस संपूर्ण जगात एकमेकांना मूर्ख बनविण्यासाठी साजरा केला जाऊ लागला. जपान आणि जर्मनीमधील लोक पूर्ण दिवस प्रक करत असतात. हा दिवस स्कॉटलँडमध्ये सलग २ दिवस साजरा केला जातो. फ्रान्समध्ये याला याला 'फिश डे' असे म्हटले जाते. या दिवशी लहान मुलं कागदाची मच्छी एकमेकांच्या पाठीवर चिटकवून दिवस साजरा करतात.