Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > महाराष्ट्र

औराद ग्रामीण रुग्णालय

औराद ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींचा मुद्दा विधानसभेत!

Aurad Rural Hospital: निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा अभाव, रिक्त पदे आणि कुटुंब नियोजन शिबिरातील कथित गैरव्यवस्थेचा गंभीर मुद्दा आता महाराष्ट्र विधानसभेत


औराद ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींचा मुद्दा विधानसभेत

Aurad Rural Hospital |

 

८ जुलैला सरकारला उत्तर द्यावे लागणार

औराद शहाजानी (Aurad Rural Hospital) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा अभाव, रिक्त पदे आणि कुटुंब नियोजन शिबिरातील कथित गैरव्यवस्थेचा गंभीर मुद्दा आता महाराष्ट्र विधानसभेत पोहोचला आहे. लातूर शहर मतदारसंघाचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला असून तो विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला आहे. या प्रश्नाचे उत्तर ८ जुलै २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांना द्यावे लागणार आहे. 

प्रश्नामध्ये ३१ मार्च २०२६ रोजी आयोजित कुटुंब नियोजन शिबिरात शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णांना बेड उपलब्ध करून न देता जमिनीवर सतरंजी व गादी टाकून झोपविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उशिरा आल्यामुळे महिला रुग्णांना सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत उपाशीपोटी थांबावे लागल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. 

याशिवाय, (Aurad Rural Hospital) ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे दहा वर्षे उलटूनही आवश्यक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी भरती न झाल्याचा तसेच वैद्यकीय अधीक्षक नियमित भेट देत नसल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. रुग्णांना बेडऐवजी जमिनीवर झोपविण्याचे दिलेले स्पष्टीकरण वैद्यकीय शास्त्राला धरून नसल्याचा आरोपही प्रश्नात करण्यात आला आहे. 

आमदार अमित देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी झाली आहे का, दोषी अधिकारी व डॉक्टरांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे, तसेच ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरून आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोणती पावले उचलली आहेत, याबाबत सरकारकडे खुलासा मागितला आहे. औराद शहाजानी ग्रामीण रुग्णालयातील सुविधांचा प्रश्न विधानसभेत पोहोचल्याने या विषयाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले गेले असून, ८ जुलै रोजी सरकारकडून होणाऱ्या उत्तराकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.