Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > महाराष्ट्र

गोंदिया आरक्षण आंदोलन

आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे  षडयंत्र: आ. राजकुमार बडोले

Gondia Reservation Andolan: गोंदियातील आंदोलनात आ. राजकुमार बडोले यांनी आरक्षण उपवर्गीकरणाच्या सरकारी निर्णयाचा तीव्र विरोध केला. ते म्हणाले की हे बहुजन समाजातील एकोप्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे.


आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे  षडयंत्र आ राजकुमार बडोले

Gondia Reservation Andolan |

गोंदियात उपवर्गीकरण विरोधात गर्जना
बदर समितीचा अहवालाची जाहीर होळी
तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

गोंदिया (Gondia Reservation Andolan) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या. बहुजन समाजाला एकत्र आणले. ते स्वप्न तोडण्याचा  उपवर्गीकरणामार्फत सरकारी प्रयत्न आहे.  समाजात फूट पाडणारा हा डाव हाणून पाडा असे आवाहन माजी सामाजिक न्यायमंत्री आ. राजकुमार बडोले (MLA Rajkumar Badole) यांनी केले. त्यांची शक्ती संपवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. ज्या समाजाला दोन हजार वर्षांपासून अस्पृश्यतेच्या नावाखाली गावाबाहेर ठेवले, अधिकारशून्य केले, त्या संपूर्ण वर्गाला बाबासाहेबांनी संविधानाच्या ३४१ व्या कलमानुसार एकसंघ मानून आरक्षणाचे कवच दिले होते. आता त्यात तुकडे पाडून सरकार 'भावा-भावांत' भांडण लावत आहे, असा घणाघाती आरोप माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले (MLA Rajkumar Badole) यांनी केले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज २५ एप्रिल रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण निर्णया विरोधात दुपारी ११ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत (Gondia Reservation Andolan) विशाल धरणे आंदोलन व निदर्शनं करण्यात आली. ४४ अंश तापमानाची तमा न बाळगता हजारों महिला-पुरूष सहभागी झाले. वीस हजारावर लोकांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. आ. बडोले (MLA Rajkumar Badole) यांनी आंदोलनाच्या प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरूषाच्या प्रतिमांना माल्यार्पण केले. तसेच डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच शहरातील मुख्य मार्गावरून विराट मोर्चा काढण्यात आला.

याप्रसंगी आमदार विनोद अग्रवाल (MLA Vinod Agarwal) यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सांगितले की, आरक्षण हा संवेदनशील विषय असताना नवीन मुद्द्यांमुळे समाजात संभ्रम निर्माण होत आहे. मूळ आरक्षणाला धक्का न लावता आधी जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. जनतेच्या मागण्यांसाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि सरकारला हा निर्णय बदलण्यास भाग पाडू, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या आंदोलनात प्रामुख्याने अमर वर्‍हाडे, नगरसेवक विजय रबडे, प्रकाश तांडेकर यशवंत गणवीर,ओबीसी नेते सुनिल पटले, राजेश नंदागवळी, अविनाश काशीवर, कविता रंगारी, ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र गणवीर, सचिन मून,अतुल गजभिये, घनश्याम पानतावणे, शालिनी डोंगरे, दीपा चंद्रिकापुरे, राजेंद्र बडोले, राजाभाऊ बनसोड, श्याम चौरे, प्रशांत शहारे, विश्वजीत डोंगरे, केवळ बघेले, गौतम साखरे, राकेश भास्कर, रणजित बारलिंगें, वर्षा सहारे, नितीन गडपायले, अजित मेश्राम, धनंजय वैद्य यांच्यासह विविध उपजातीचे प्रतिनिधी हजारोंच्या संख्येने  उपस्थित होते. (Gondia Reservation Andolan) आंदोलनाच्या शेवटी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले.

 बदर अहवालाची जाहीर होळी

आंदोलकांच्यावतीने (Gondia Reservation Andolan) न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाच्या प्रतींचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या या जिल्ह्यातील या विशाल आंदेलनाने राज्याचे लक्ष वेधून घेतले.  आपल्या तडाखेबंद भाषणात राजकुमार बडोले पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिला, तो संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का देणारा आहे. राज्य सरकारने घाईघाईने स्थापन केलेल्या बदर समितीत ५९ अनुसूचित जातींपैकी एकाही विद्वान लोकप्रतिनिधीला किंवा तज्ज्ञाला स्थान दिले नाही. १९३१ नंतर जातीय जनगणना झाली नसताना, सरकारकडे कोणता 'ऑब्जेक्टिव्ह डेटा' उपलब्ध आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात महार-बौद्ध ६१ टक्के, मातंग १८.७०  टक्के, चर्मकार १०.७  टक्के, खाटीक ०.८०  टक्के, सफाई कामगार १.७ टक्के अशी आकडेवारी असताना, उपवर्गीकरणामुळे छोट्या जातींना नेमके काय मिळणार? हा केवळ भ्रमिष्ट करण्याचा प्रकार आहे. सरकारने तात्काळ हा अहवाल सार्वजनिक करावा,  संसदेत कायदा करून हा निर्णय रद्द करावा, अन्यथा हा वणवा गोंदियापासून संपूर्ण महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Related to this topic: