Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

लातूर भूषण पुरस्कार

व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांना लातूर भूषण पुरस्कार

Latur Bhushan Award:


व्ही एस पँथर्स युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांना लातूर भूषण पुरस्कार

Latur Bhushan Award |

लातूर (Latur Bhushan Award) : व्ही. एस. पॅंथर्स युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने लातूर भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 
येथील व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवतात. त्यामध्ये सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा, भव्य रक्तदान शिबिरे, रोगनिदान शिबिरे, नेत्ररोग तपासणी शिबिरे, कुटुंब समुपदेशन शिबीर, बेरोजगार मेळावा अशा उपक्रमांचा समावेश असतो. विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून समाजाचे ऋण फेडण्याच्या हेतूने नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांना यावर्षीचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने दिला जाणारा लातूर भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

 हा (Latur Bhushan Award) पुरस्कार वितरण सोहळा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी  लातूर येथील दयानंद सभागृहात संपन्न होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विनोद भाऊ खटके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related to this topic: