वाशीम जिल्हा वृक्षतोड बंद

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हयात वृक्षतोड तात्काळ बंद करा!

Washim district Tree felling stop: सन २०२६-२०२७ या कालावधीत पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आकांक्षित वाशीम जिल्ह्यातील सर्व प्रकारची वृक्षतोड तात्काळ

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हयात वृक्षतोड तात्काळ बंद करा!

Washim district Tree felling stop

 

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्राची मागणी

मानोरा (Washim district Tree felling stop) : सन २०२६-२०२७ या कालावधीत पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आकांक्षित वाशीम जिल्ह्यातील सर्व प्रकारची वृक्षतोड तात्काळ बंद करून बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित वन अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना दि. २७ ऑक्टोंबर रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, महाराष्ट्रचे  उपप्रचार संघटक आकाश  पाटील आणि सहप्रचारक संजय  गावंडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात नमूद केले की, सन २०२६-२०२७ या कालावधीत पावसाच्या अभावामुळे परिसरात पाणीटंचाई, शेतीवरील संकट आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वृक्षांचे संवर्धन करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. झाडे ही पर्जन्यचक्र, जमिनीतील ओलावा, भूजल पातळी, जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अकांक्षित वाशीम जिल्ह्यातील जंगलामध्ये तसेच खासगी, शासकीय, महसूल व इतर जमिनीवरील झाडांची अनियंत्रित तोड रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील सर्व प्रकारची बेकायदेशीर वृक्षतोड तात्काळ बंद करून, वृक्षतोड करणाऱ्यांवर आणि संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा. बेकायदेशीर वृक्षतोड असल्यास सक्त कारवाई करावी, जिल्ह्यातील कत्तल, शासकीय जमीन, महसूल जागा, रस्त्यालगतची झाडे आणि खासगी मालकीच्या जमिनीवरील वृक्षतोडीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष भरारी पथक तयार करावे आणि त्यावर नियमित देखरेख ठेवावी,   ज्या कर्मचाऱ्याचा किंवा संबंधित वन अधिकाऱ्याच्या कार्यकक्षेत बेकायदेशीर वृक्षतोड आढळल्यास, त्या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे झाली असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर विभागीय चौकशी आणि कायदेशीर कारवाई करावी, कागदोपत्री कसल्याही प्रकारच्या खोट्या परवानग्या, बनावट आदेश किंवा बेकायदेशीररीत्या वृक्षतोड करण्यास परवानगी दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

बेकायदेशीर वृक्षतोड (Washim district Tree felling stop) थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, जिल्ह्यातील प्रत्येक तहसील व वनपरिक्षेत्र स्तरावर वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता पथक नेमावे. या पथकाने नियमित गस्त घालावी, जिल्ह्यातील वृक्षसंवर्धनासाठी स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि संवर्धनाचा कार्यक्रम राबवावा,  जिल्ह्यातील नागरिक, ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून वृक्षारोपण, संवर्धन आणि जतनाबाबत जनजागृती करावी. तसेच तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावण्याची सक्ती करावी.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तोडलेल्या झाडांचा हिशोब आणि त्या बदल्यात करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची माहिती लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावी, वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून संपूर्ण जिल्ह्यातील वृक्षसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात. वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आदेश काढावेत. बेकायदेशीर वृक्षतोड रोखावी आणि संबंधित अधिकारी किंवा व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, असे न केल्यास माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन व वंचितमी यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनाची दखल घेऊन केलेल्या कार्यवाहीची माहिती आम्हाला लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी आकाश  पाटील, संजय गावंडे, हरिष कानोडे, अंबर मोंढे, चंद्रकांत कोल्हे, हरिभाऊ ठाकरे,  गणेश सखाराम राठोड,  उमेश वानखडे, शिवम इंगोले,  कुणाल गावंडे आदी उपस्थित होते.