भीमाशंकर अभयारण्य वृक्षतोडी

'अवैध वृक्षतोडीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका', भीमाशंकर अभयारण्याबाबत वन विभागाचे स्पष्टीकरण

Bhimashankar Sanctuary Tree Felling: मागील दोन ते तीन दिवसांपासून भीमाशंकर अभयारण्यामध्ये एका कंपनीच्या प्रकल्पासाठी अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या बातम्या सोशल मीडिया आणि विविध माध्यमांद्वारे

'अवैध वृक्षतोडीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका', भीमाशंकर अभयारण्याबाबत वन विभागाचे स्पष्टीकरण

Bhimashankar Sanctuary

पुणे (Bhimashankar Sanctuary Tree Felling) : मागील दोन ते तीन दिवसांपासून भीमाशंकर अभयारण्यामध्ये एका कंपनीच्या प्रकल्पासाठी अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या बातम्या सोशल मीडिया आणि विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वन विभागाने या वृत्ताचे खंडन करत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

भीमाशंकर अभयारण्यामध्ये (Bhimashankar Sanctuary) कोणत्याही कंपनीच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड सुरू नाही, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्या तथ्यहीन असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुणे उपवनरक्षक (वन्यजीव) केशव वाबळे यांनी काढलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

भीमाशंकर अभयारण्य (Bhimashankar Sanctuary) हे जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील क्षेत्र असून येथील वनसंपदेच्या संरक्षणासाठी वन विभाग कटिबद्ध आहे. कोणत्याही प्रकल्पासाठी झाडे तोडण्याची परवानगी दिलेली नाही आणि प्रत्यक्षात तेथे कोणतेही वृक्षतोडिचे काम सुरू नाही. तरी नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी आणि चुकीची माहिती पसरवू नये, असेही वन विभागाने म्हटले आहे. प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. या संदर्भात उपवन रक्षक वन्यजीव विभाग पुणे चे केशव ज.वाबळे यांनी पत्र काढले आहे.

संबंधित सामग्री

धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

Maharashtra Dam Water Storage: धरणांमधील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली असून, राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ 64.17 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा 90.54 टक्के

Nov 16, 2026
अजित पवारांच्या पुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

अजित पवारांच्या पुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

अमित शाह यांच्या हस्ते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; दादांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावूक, म्हणाल्या खचून जाणार नाही!

Nov 16, 2026
बंगालच्या उपसागरात सलग तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट; ‘अक्वान’ वादळाची शक्यता

बंगालच्या उपसागरात सलग तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट; ‘अक्वान’ वादळाची शक्यता

Bengal Cyclone Crisis: बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाल

Nov 16, 2026
महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील ३ नामांकित हॉटेल्सचे FDA कडून अन्न विक्री परवाने निलंबित. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरूच!

Nov 16, 2026
भंडाऱ्यात घरात घुसून वाघाने सहा महिन्यांच्या बाळाला उचलले; दुर्दैवी मृत्यूने तिर्री गाव हादरले!

भंडाऱ्यात घरात घुसून वाघाने सहा महिन्यांच्या बाळाला उचलले; दुर्दैवी मृत्यूने तिर्री गाव हादरले!

भंडाऱ्यात वाघाने घरात शिरून सहा महिन्यांच्या बाळावर हल्ला केला. तिर्री येथील या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा.

Nov 14, 2026