Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

लातूर सीजेपी आंदोलन

गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही!

Latur CJP Agitation: गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा देत सीजेपी आंदोलनासाठी वकिलांची फौज तयार आहे, अशी भूमिका एडवोकेट उदय गवारे यांनी एका पत्रकांन्वये


गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही

Latur CJP Agitation |

 

सीजेपी आंदोलनासाठी वकिलांची फौज तयार: अँड. उदय गवारे 

लातूर (Latur CJP Agitation) : गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा देत सीजेपी आंदोलनासाठी वकिलांची फौज तयार आहे, अशी भूमिका एडवोकेट उदय गवारे यांनी एका पत्रकांन्वये जाहीर केली. अभिजीत दिपके आणि इतरांवर औसा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर अडवोकेट गवारे यांनी हे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधा, शिक्षणाचा दर्जा, उपलब्ध शिक्षक व इतर महत्त्वपूर्ण बाबींचा आढावा घेण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके व त्यांचे सहकारी लातूर जिल्ह्यातील औसा  जिल्हा परिषद शाळेमध्ये पाहणीसाठी गेले असता तेथील शाळांची दुरावस्था पाहून भाष्य केले आणि त्याबाबतचे चित्रीकरण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा आणि तेथील शिक्षणाचा दर्जा याबाबत शासन उदासीन आहे.

अनेक जिल्हा परिषद, नगर परिषद शाळा बंद पडत आहेत.सर्वांना मोफत व दर्जेदार शिक्षण आणि शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याऐवजी खाजगीकरण करून केवळ भरमसाठ फीस गोळा करून सामान्य जनतेवर आर्थिक बोजा लादण्याचा सरकारचा प्रयत्न असून या विरोधात चलो स्कूल चले हम हे अभिनव उपक्रम राबवला जात असताना शासनाने त्याची धसकी घेऊन अभिजीत दिपके व त्यांच्या सहकारी यांच्यावर दाखल केलेला गुन्हा तात्काळ परत घ्यावेत. गुन्हे दाखल केल्यामुळे तरुणाईचा आवाज दाबता येणार नाही.

संपूर्ण राज्यात कॉक्रोच जनता पार्टी तसेच सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी होणाऱ्या आंदोलनासाठी राज्यभर वकिलांची फौज तयार आहे. आंदोलनातील सर्व पोलीस प्रकरणे मोफत चालवण्याचा निर्णय विधी जागृती अभियान आणि विधी आघाडी शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने घेतलेला असून (Latur CJP Agitation) आंदोलनकर्त्यांनी पोलीस केसच्या धमकीला भीक न घालता शांततेच्या मार्गाने न्याय हक्कासाठी आंदोलन केलेच पाहिजे, असे परिपत्रक अँड. उदय गवारे यांनी प्रसिद्ध दिले आहे.

Related to this topic: