Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

चिखलदरा विद्यार्थी मृत्यू

ब्रिटिशकालीन बंधार्‍याच्या डोहात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Chikhaldara student death: खटकाली गावाजवळील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सातपुड्याच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत ही दुर्घटना घडल्याने आकोट शहरात हळहळ


ब्रिटिशकालीन बंधार्‍याच्या डोहात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Chikhaldara student death |

 

शिक्षिकेसह सातपुडा परिसरात फिरण्यासाठी गेले होते विद्यार्थी

चिखलदरा (Chikhaldara student death) : आकोट शहरातील दोन १६ वर्षीय विद्यार्थ्यांचा सोमवारी दुपारी चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावाजवळील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सातपुड्याच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत ही दुर्घटना घडल्याने आकोट शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 

मृत विद्यार्थ्यांची नावे गिरिधर चंद्रशेखर दाभाडे (१६) आणि कृष्णा चंद्रशेखर झामरे (१६) अशी आहेत. दोघेही आकोट येथील अंसकी कॉन्व्हेंट शाळेत इयत्ता ११वीत शिक्षण घेत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे ३ वाजता अंसकी कॉन्व्हेंटचे काही विद्यार्थी सातपुडा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत एक शिक्षिकाही होती. चार विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी खटकाली गावाजवळील ब्रिटिशकालीन बंधारा पाहण्यासाठी गेले होते. बंधारा आणि डोहातील पाण्याचे आकर्षक दृश्य पाहून दोन्ही विद्यार्थ्यांनी पाण्यात उतरून पोहण्याचा प्रयत्न केला; मात्र (Chikhaldara student death) डोहाची खोली आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन खोल पाण्यात बुडाले.

घटनेची (Chikhaldara student death) माहिती मिळताच खटकाली परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने दोन्ही विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला. बराच प्रयत्न केल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आले.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलिस निरीक्षक पाटील हे पोलिस पथकासह घटनास्थळी रवाना झाले. पुढील कारवाई व शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह आकोट ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन होतकरू विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूने दोन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.