‘निवृत्ती सन्मान योजना’

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी शिंदेंचा मोठा ‘रिटर्न गिफ्ट’!

Eknath Shinde: राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक-मालक कल्याणकारी मंडळा’ची सुरुवात केली आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी शिंदेंचा मोठा ‘रिटर्न गिफ्ट’!

Eknath Shinde

ठाणे (Eknath Shinde ) : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक-मालक कल्याणकारी मंडळा’ची सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते शुक्रवारी ठाण्यात या मंडळाचा शुभारंभ करण्यात आला.

या माध्यमातून वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांसाठी ‘निवृत्ती सन्मान योजना’ सुरू करण्यात आली आहे. Eknath Shinde  या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जाणार आहे. आतापर्यंत बँक खात्याची माहिती उपलब्ध असलेल्या सुमारे ७३५ लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने निधी दिला जाणार आहे.

विमा, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणालाही मदत

कल्याणकारी मंडळामार्फत केवळ निवृत्ती निधीच नव्हे, तर चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध सामाजिक सुरक्षा योजना राबवल्या जाणार आहेत. यामध्ये जीवन विमा, कर्तव्य बजावताना अपंगत्व आल्यास विमा संरक्षण, आरोग्यविषयक मदत आणि कामाच्या वेळी दुखापत झाल्यास आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.

चालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आली आहे. दहावीमध्ये ७५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये, तर बारावीमध्ये ७५ टक्के गुण मिळविणाऱ्यांना ७ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.Eknath Shinde  पदवी अभ्यासक्रमासाठीही गुणांच्या आधारे शैक्षणिक मदत देण्याची योजना आहे.

‘चालक केवळ प्रवासी वाहतूक करत नाहीत’

यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. कोरोना काळात अनेक चालकांनी स्वतःचा धोका पत्करून रुग्णांना रुग्णालयात पोहोचवले. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे घरी पोहोचवणे, महिला व मुलांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देणे, अशा विविध प्रकारे चालक समाजासाठी योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

नियमित नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळतो; मात्र रिक्षा-टॅक्सी चालकांचे उत्पन्न दैनंदिन मेहनतीवर अवलंबून असते. त्यामुळे वयाच्या ६५ वर्षांनंतर त्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, या मंडळाच्या माध्यमातून चालकांच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असून, विविध सामाजिक घटकांप्रमाणेच प्रवासी वाहतूक क्षेत्रातील कष्टकरी वर्गालाही सामाजिक सुरक्षेचे कवच देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

बावनकुळेंनी सांगितले मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय; शेगाव संस्थानाला ३.८१ हेक्टर जमीन, पाणी योजनांसाठी निधी

बावनकुळेंनी सांगितले मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय; शेगाव संस्थानाला ३.८१ हेक्टर जमीन, पाणी योजनांसाठी निधी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय: शेगाव संस्थानाला ३.८१ हेक्टर जमीन, पाणी योजनांसाठी निधी, चारा व्यवस्था आणि ओबीसी मागण्यांवर चर्चा.

Oct 14, 2026
अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट; प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार

अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट; प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार

महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज भेट मिळणार. २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ; ४२.८१ कोटींचा निधी.

Oct 14, 2026
CJP नेत्यांच्या अटकेवरून राहुल गांधी आक्रमक; शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावरून केंद्रावर हल्लाबोल

CJP नेत्यांच्या अटकेवरून राहुल गांधी आक्रमक; शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावरून केंद्रावर हल्लाबोल

Rahul Gandhi: दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनावरून सुरू झालेला वाद आता राजकीयदृष्ट्या अधिक तीव्र झाला आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या दोन नेत्यांना अटक करून तिहार तुरुंगात पाठवण्यात आले..

Oct 14, 2026
नवरात्रीच्या परंपरेचे कारण देत मृत बाळापासून दूर राहिले आई-वडील; स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी केला अंत्यविधी

नवरात्रीच्या परंपरेचे कारण देत मृत बाळापासून दूर राहिले आई-वडील; स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी केला अंत्यविधी

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवरात्रीच्या परंपरेचे कारण देत आई-वडिलांनी मृत बाळाला स्पर्श केला नाही. स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत अंत्यविधी केला.

Oct 14, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 5 हजार रुपये

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 5 हजार रुपये

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू.

Oct 14, 2026