राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; कठोर कारवाईचे निर्देश

Rana Suryavanshi attack case: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने बारामती परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गंभीर दखल

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; कठोर कारवाईचे निर्देश

Rana Suryavanshi attack case

बारामती (Rana Suryavanshi attack case) : उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने बारामती परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी गंभीर दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी (Rana Suryavanshi attack case) यांच्यावर रविवारी (ता. १८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बारामती विमानतळ परिसरात हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत सूर्यवंशी यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या (Rana Suryavanshi attack case) घटनेनंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पोलिस प्रशासनाशी संपर्क साधत तपास जलदगतीने पूर्ण करण्यावर भर दिला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून, अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, हल्ल्यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. घटनास्थळावरील पुरावे आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

हल्ल्यामागील कारण काय?

उद्योजकावर झालेल्या या (Rana Suryavanshi attack case) हल्ल्यामागे नेमके कोणते कारण आहे, तसेच यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत सध्या स्पष्टता नाही. पोलिस तपासातून हल्ल्याचे कारण आणि संबंधित व्यक्तींची भूमिका समोर येण्याची अपेक्षा आहे.

संबंधित सामग्री

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला वेग? अजितदादा गटाचे सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला जाणार; बुधवारी भेटीसाठी मागितला वेळ!

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला वेग? अजितदादा गटाचे सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला जाणार; बुधवारी भेटीसाठी मागितला वेळ!

अजित पवार गटाच्या सर्व आमदारांनी शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.

Nov 10, 2026
विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील’; सुनील तटकरेंच्या विधानाने राजकीय चर्चांना वेग

विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील’; सुनील तटकरेंच्या विधानाने राजकीय चर्चांना वेग

NCP विलिनीकरणावर सुनील तटकरे यांचे सूचक विधान. पुण्यात सुनेत्रा पवारांची भेट घेणार असून राष्ट्रवादीच्या अर्थखात्याचीही केली मागणी.

Nov 10, 2026
‘विलिनीकरण ठरले तर आम्हाला सांगतील’; राष्ट्रवादीच्या चर्चांवर फडणवीसांचे भाष्य

‘विलिनीकरण ठरले तर आम्हाला सांगतील’; राष्ट्रवादीच्या चर्चांवर फडणवीसांचे भाष्य

NCP विलिनीकरणावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान. शरद पवार, सुनेत्रा पवार, गोकुळ वाद आणि बिश्नोई टोळीवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.

Nov 10, 2026
पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू; PM मोदींच्या हस्ते २१,८०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू; PM मोदींच्या हस्ते २१,८०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

पुणे मेट्रोची हिंजवडी-शिवाजीनगर पिंक लाईन सुरू! सकाळी ६ ते रात्री ११.४० पर्यंत सेवा; जाणून घ्या वेळापत्रक आणि सुविधा.

Nov 03, 2026
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी मंत्र्याचं फडणवीस मंत्रिमंडळात कमबॅक?

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी मंत्र्याचं फडणवीस मंत्रिमंडळात कमबॅक?

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी मंत्र्याचं फडणवीस मंत्रिमंडळात कमबॅक होणार? मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना वेग.

Nov 02, 2026