Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

पापा जाधव हत्या

राजुरा न्यायालयासमोर दिवसाढवळ्या गोळीबार; ‘पापा’ जाधवची हत्या

Papa Jadhav murder: राजुरा न्यायालयासमोर प्रदीप बारजवळ सोमवारी सायंकाळी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने शहरात खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी सोमनाथपूर वॉर्डातील विनोद उर्फ ‘पापा’ जाधव यांच्यावर गोळीबार


राजुरा न्यायालयासमोर दिवसाढवळ्या गोळीबार ‘पापा’ जाधवची हत्या

Papa Jadhav murder |

राजुरा/ चंद्रपूर (Papa Jadhav murder) : राजुरा न्यायालयासमोर प्रदीप बारजवळ सोमवारी सायंकाळी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने शहरात खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी सोमनाथपूर वॉर्डातील विनोद उर्फ ‘पापा’ जाधव यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली. दरम्यान, गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले. (Papa Jadhav murder) घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत करण बाविस्कार आणि करण मेकलवार या दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. न्यायालयासमोर आणि शहरातील वर्दळीच्या मुख्य मार्गालगत दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिक व वाहनांची मोठी वर्दळ असताना हल्लेखोरांनी गोळीबार करून पसार झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विनोद उर्फ ‘पापा’ जाधव (Papa Jadhav murder) हे जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होते. त्यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुना वाद, आपसी रंजिश की अन्य कारण, याचा तपास राजुरा पोलीस करीत आहेत. राजुरा शहरात यापूर्वीही गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या हत्येनंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था आणि अवैध शस्त्रांवरील पोलिसांच्या कारवाईबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Related to this topic: