आ. श्वेता महाले पाटील

बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची आ. श्वेता महाले पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

MLA Shweta Mahale Patil: बुलढाणा जिल्ह्याला राजमाता जिजाऊंच्या गौरवाने 'राजमाता जिजाऊनगर' ह्या नावाने नवा सन्मान देण्याची मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची आ. श्वेता महाले पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

MLA Shweta Mahale Patil

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीचा ऐतिहासिक सन्मान वाढविण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या नामकरणाचा हा विषय आता प्रशासकीय पातळीवर पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजमाता जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या सिंदखेडराजा या ऐतिहासिक स्थळामुळे बुलढाणा जिल्ह्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. त्यांच्या या अतुलनीय योगदानाला कायमस्वरूपी अभिवादन म्हणून जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल

आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale Patil) यांनी सादर केलेल्या निवेदनात बुलढाणा जिल्ह्याची ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनविषयक वैशिष्ट्येही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा, लोणार सरोवर, शेगावचे संत गजानन महाराज मंदिर, मेहकरचे श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य तसेच विविध धार्मिक व पर्यटनस्थळांमुळे बुलढाणा जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे.

या मागणीचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ही बाब नामकरणाच्या मागणीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राजमाता जिजाऊंच्या नावाने जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale Patil) यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ‘राजमाता जिजाऊनगर’ नामकरणाचा मार्ग प्रशासकीय प्रक्रियेतून पुढे जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

“जिजाऊंच्या महान कार्याला अभिवादन म्हणून नामकरण व्हावे”

“राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा सन्मान आणि त्यांच्या महान कार्याला अभिवादन म्हणून बुलढाणा जिल्ह्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ हे नाव मिळावे, ही माझी मनापासूनची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश दिल्याबद्दल त्यांचे आभार,” असे आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी म्हटले आहे. यामुळे राजमाता जिजाऊंच्या नावाने बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

संबंधित सामग्री

नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी केला शब्द पूर्ण; अंकुशराव पडघान पाटील यांच्या विनंतीला प्रतिसाद

नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी केला शब्द पूर्ण; अंकुशराव पडघान पाटील यांच्या विनंतीला प्रतिसाद

Buldhana District Central Cooperative Bank: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या बळकटीकरणासाठी विविध स्तरातून प्रयत्न सुरू असतानाच चिखली नगर परिषदेचे नगराध्यक्ष तथा श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थे...

Oct 15, 2026
दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

MLA Shweta Mahale Patil: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये..

Oct 14, 2026
मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश

बुलढाण्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; ‘ट्रिगर-१’ लागू. आमदार चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश.

Sep 26, 2026
बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

MLA Shweta Mahale Patil: शेतकऱ्यांची व्यथा केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत..

Sep 24, 2026
बुलढाणा जिल्ह्यात सरसकट नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांसह देविदास कणखर, विनायक सरनाईक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

बुलढाणा जिल्ह्यात सरसकट नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांसह देविदास कणखर, विनायक सरनाईक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

Buldhana district dry drought: जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

Sep 24, 2026