‘पोलीस आणि लाठ्यांना घाबरू नका’; 1 नोव्हेंबरला रामलीला मैदानावर जमण्याचे विद्यार्थी-तरुणांना आवाहन
नवी दिल्ली (Chalo Dilli Rahul Gandhi Protest) : लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि संविधानाच्या रक्षणासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांना 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित (Chalo Dilli Andolan) ‘चलो दिल्ली रामलीला मार्च’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षापुरते मर्यादित नसून लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची मोहीम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी पोलीस आणि लाठ्यांना घाबरू नये, असे आवाहनही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी, 29 ऑक्टोबर रोजी समाजमाध्यमांवर एक चित्रफीत प्रसिद्ध करून या (Chalo Dilli Andolan) आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dyanesh Kumar) यांच्यावर निशाणा साधला. लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि संविधानाचे रक्षण करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने या मोर्चात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.
नमस्कार, चलो दिल्ली रामलीला मार्च, लोकतंत्र को बचाने का, वोट चोरी को रोकने का, संविधान को बचाने का मार्च है। यह किसी एक राजनीतिक पार्टी का मार्च नहीं - यह हिंदुस्तान की आत्मा का मार्च है। सब लोग जो नरेंद्र मोदी, अमित शाह, ज्ञानेश कुमार से तंग हैं। सब लोग जो लोकतंत्र को बचाना चाहते हैं, संविधान की रक्षा करना चाहते हैं, आप सब आइए। एक ही protest है - देश का protest है। Don't worry about the police, don't worry about lathis - the BJP will not have the guts to try any of their antics. Come march with us - we will walk together to protect the Constitution, to protect the Indian nation. घबराने की जरूरत नहीं है। I urge all student groups, regardless of your political affiliation - if you feel that India is under attack, if you feel you are under attack, your expression, your ideas, your way of thinking is under attack, come and join us. It will be a fantastic march, and it's a march for the soul of this country. Looking forward to seeing all of you there. 🗓️ 1 नवंबर 📍 रामलीला मैदान, नई दिल्ली #ChaloDilli
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 29, 2026
विद्यार्थ्यांना राजकीय विचारधारेचा विचार न करता सहभागी होण्याचे आवाहन
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या संदेशातून विद्यार्थ्यांना कोणत्याही राजकीय विचारधारेचा विचार न करता मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर, विचारांवर आणि लोकशाही अधिकारांवर गदा येत असल्याचे वाटत असेल, तर त्यांनी आपला आवाज बुलंद केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. भारतीय राष्ट्र, संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी हा मार्च आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Chalo Dilli Andolan) आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी घाबरण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
चलो दिल्ली ✊ 1 नवंबर को महारैली होने जा रही है। पूरा देश रामलीला मैदान में जुटेगा और लोग वोट की रक्षा के लिए आवाज उठाएंगे। आप भी दिल्ली आइए, क्योंकि भारत का लोकतंत्र हमें पुकार रहा है। : उत्तराखंड के पूर्व मुख्यमंत्री श्री @harishrawatcmuk #ChaloDilli https://t.co/4OkbLPJbet
— Congress (@INCIndia) October 29, 2026
‘मतचोरी’विरोधातील मोहीम तीव्र करण्याची तयारी
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून (SIR) काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीने आपली ‘मतचोरी’विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याची तयारी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dyanesh Kumar) यांना पदावरून हटविण्याची मागणीही आघाडीतील नेत्यांकडून केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, निवडणूक आयोगाविरोधात प्रतीकात्मक ‘जनता महाभियोग’ कार्यक्रम आयोजित करण्याची योजनाही समोर आली आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीही ‘चलो दिल्ली’चे आवाहन केले आहे. या (Chalo Dilli Andolan) आंदोलनासाठी देशभरातून कार्यकर्ते, विद्यार्थी, तरुण आणि समर्थकांना एकत्रित करण्याची तयारी काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी सुरू केली आहे. या (Chalo Dilli Andolan) मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.