Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

प्रकाश राज

‘हुकूमशाही मानसिकतेचा अंत जवळ’: प्रकाश राज

Prakash Raj: देशातील तरुणांनी विविध प्रश्नांवर उभारलेल्या आंदोलनांमुळे हुकूमशाही मानसिकतेचा अंत जवळ आला आहे. मात्र, केवळ विद्यमान सरकारचा पराभव करून चालणार नाही; त्याऐवजी येणारी शक्ती पुन्हा...


‘हुकूमशाही मानसिकतेचा अंत जवळ’ प्रकाश राज

Prakash Raj |

तरुणांनी राजकीयदृष्ट्या जागरूक राहून योग्य पर्याय निवडावा

त्रिशूर (Prakash Raj) : देशातील तरुणांनी विविध प्रश्नांवर उभारलेल्या आंदोलनांमुळे हुकूमशाही मानसिकतेचा अंत जवळ आला आहे. मात्र, केवळ विद्यमान सरकारचा पराभव करून चालणार नाही; त्याऐवजी येणारी शक्ती पुन्हा त्याच प्रवृत्तीची ठरू नये, यासाठी तरुणांनी राजकीयदृष्ट्या जागरूक राहणे आवश्यक आहे, असे अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी म्हटले आहे. केरळमधील त्रिशूर येथे डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या राज्य परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करीत होते.

नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात तरुणांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करीत प्रकाश राज म्हणाले की, तरुणांनी प्रथमच सत्तेला आपण घाबरत नसल्याचे दाखवून दिले. दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले. त्यांनी हिंसेचा मार्ग न स्वीकारता प्रश्न विचारण्याची भूमिका घेतली, ही अभिमानाची बाब असल्याचेही (Prakash Raj) त्यांनी सांगितले. शेतकरी, कामगार आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली.

मात्र, नोकरी किंवा जमीन गमावण्याच्या भीतीमुळे त्यांना एका मर्यादेपलीकडे जाता आले नाही. तरुणांकडे गमावण्यासारखे काही नसल्यामुळे त्यांचे आंदोलन अधिक प्रभावी ठरत असल्याचा दावा प्रकाश राज यांनी केला. सामाजिक माध्यमांमुळे आंदोलनाची ठिकाणे आणि स्वरूप बदलले आहे. आता आंदोलन केवळ जंतरमंतरपुरते मर्यादित राहिलेले नाही, असे त्यांनी (Prakash Raj) नमूद केले.