मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव
वर्धा/ हिंगोली (Prof. Dr. Pranita Subhash Jirwankar) : अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (AIHER), सावंगी, जि. वर्धा येथे १७ वा दीक्षांत समारंभ दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मुख्य कार्यक्रमास मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकजजी भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पहोते. विद्यापीठाच्या कुलपती (Chancellor) डॉ. प्रीती अदाणी, प्रतिकुलपती/ मुख्य सल्लागार प्रा. डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. ललितभूषण एस. वाघमारे व प्र-कुलगुरू डॉ. गौरव मिश्रा हे देखील मंचावर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी पदवी मिळविण्यात मुलींची संख्या जास्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या समारंभात राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांची कन्या (Prof. Dr. Pranita Subhash Jirwankar) प्रा. डॉ. प्रणिता सुभाष जिरवणकर यांना PhD (फार्मास्युटिकल केमिस्ट्री) पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांना हे यश संपादन करण्यासाठी सुपरवायझर डॉ. सुरेंद्र अग्रवाल व प्रा. डॉ. दीपक खोब्रागडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्राचार्य डॉ. अनिल पेठे व कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या यशाबद्दल आई उज्ज्वला सुभाष जिरवणकर, शिक्षणाधिकारी संदिप सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी आसावरी काळे, कैलास बोरकर, जेष्ठ अधिव्याख्याता डाॅ गंगाधर वाळले, हिंमतराव तायडे, मधुकर राऊत, योगेश गवते, दशरथ शिंगारे, माधव वायचाळ, त्र्यंबकराव पोघे, संभाजी डुबे, महमुद सय्यद, रामराव वराड, शंकर जाधव, अर्जुन मुंढे, रघुनाथ भांडारकर, गजानन पेंदे, सुधीर गोगटे, डाॅ गजानन वानखेडे, किशोर दोडल, राजेंद्र बेंगाळ, राजकुमार क्षिरसागर , नागठाणे, शंकर शिंदे, राजु मोरे , गजानन टाले, श्रीकृष्ण डांबलकर, विकास फटांगळे, अंगद साबणे, मानसी गावडे, शोभा माने, कल्याण सोळुंके, धनराज वाणी, शोभा माने, शांता पाटील, दिलीप चौधरी, गोरख तावरे, शिवानंद भरले, शिवाजी खोडके, श्रीराम महाजन, गजानन पेदे, गोवर्धन मुंदडा, घनश्याम पटले, कॅप्टन मोहन गुजरकर, देवेंद्र गाठे, सुनिल गुरव, रामलिंग मुळे, डाॅ रत्ना चौधरी, राजकुमार तिरभाने आदी मित्रमंडळींनी कौतुक केले आहे.