प्रा. आदिती ऋषिकेश पोहरे

बदलत्या भारतासाठी सक्षम शिक्षक आमदार हवा: माजी आमदार राहुल बोंद्रे

Prof. Aditi Rishikesh Pohare: अमरावती विधान परिषद शिक्षक मतदार संघातील 26 उमेदवारांमध्ये प्रा. आदिती ताई ऋषिकेश पोहरे (Prof. Aditi Rishikesh Pohare) या सक्षम उमेदवार दिसून येतात.

बदलत्या भारतासाठी सक्षम शिक्षक आमदार हवा: माजी आमदार राहुल बोंद्रे

Prof. Aditi Rishikesh Pohare

 

प्रा. आदितीताई पोहरे यांना निवडून देण्याचे आवाहन

चिखली (Prof. Aditi Rishikesh Pohare) : चिखली स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात पार पडलेल्या अमरावती विधान परिषद शिक्षक आमदार निवडणूक प्रचार सभेत बोलताना माजी आमदार राहुल बोंद्रे (MLA Rahul Bondre) म्हणाले, "सद्यस्थितीत देश समस्यांनी घेरलेला आहे‌, सगळीकडे अडवणुकीचे वातावरण आपल्याला दिसत आहे. 1968 च्या कोठारी आयोग आणि 1986 च्या दुसऱ्या शैक्षणिक धोरणाने देशाची मोठ्या प्रमाणात प्रगती केली होती. मात्र 34 वर्षानंतर आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात समस्या उभ्या केल्या आहेत". या समस्येतून मार्ग काढण्यासाठी येणाऱ्या काळात शिक्षक आमदाराची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यासाठी शिक्षक आमदार हा शिक्षकच, गोल्ड मेडालिस्ट आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारा असावा. अमरावती विधान परिषद शिक्षक मतदार संघातील 26 उमेदवारांमध्ये प्रा. आदिती ताई ऋषिकेश पोहरे (Prof. Aditi Rishikesh Pohare) या सक्षम उमेदवार दिसून येतात.

ते (MLA Rahul Bondre) पुढे म्हणाले "आफ्रिकन विद्यापीठातील प्रोफेसर मायकेल बून  यांच्या  एखादा देश उध्वस्त करायचा असेल तर त्याची शिक्षण व्यवस्था कमकुवत करा", यांच्या या विधानाची आठवण करून देत शिक्षण व्यवस्थेतील समस्यांचा पाढा वाचला. आजची राजकारणाची गलिच्छ स्थिती. टोकाचा विरोध, आणि शैक्षणिक संस्थे समोरील आव्हाने याची मांडणी करून मी सुद्धा अशा परिस्थितीत मध्यंतरी निराश झालो होतो, परंतु एका आशेच्या किरणाने परत मी फिनिक्स पक्षासारखा उभा झालो. गोरगरिबांच्या, ग्रामीण जनतेसाठी  शिक्षण संस्था, आणि शिक्षणातील समस्येसाठी मी परत उभा झालो. आज शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या शिक्षकांच्या अनेक समस्या दूर करायच्या असतील तर खऱ्या अर्थाने सक्षम अशा प्रा. आदिती ऋषिकेश पोहरे यांनाच आपण निवडून दिले पाहिजे. असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले.

यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रा. आदिती ताई ऋषिकेश पोहरे (Prof. Aditi Rishikesh Pohare) यांनी शिक्षण व्यवस्थेतील सद्यस्थितीवर प्रकाश टाकत, जुनी पेन्शन योजने पासून तर शिक्षकांच्या पदोन्नती व अशैक्षणिक कामे, नवीन बदलते धोरण, इत्यादी संदर्भातील  अनेक समस्यांचा पाढाच वाचला.  शिक्षक आणि विदर्भाच्या समस्या काय आहेत हे मी लहानपणापासूनच बघत आले आहे. घरी येणाऱ्या लोकांच्या अडचणी भैय्यासाहेब विधिमंडळात कशा सोडवतात याचा जवळून मला परिचय असल्यामुळे मी सक्षम पणे विधान परिषदेत कार्य करू शकेल. माजी शिक्षक आमदार स्वर्गीय नानासाहेब लंके ते वसंतराव खोटरे, स्वर्गीय बी.टी. देशमुख यांच्या शिक्षण, समाजसेवेतील कार्याची प्रेरणा घेऊन कार्य करण्याची ग्वाही मतदारांना दिली.

यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी कॅबिनेट कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी बी.टी. देशमुख यांच्या राजकारणातील नैतिक वजन आणि कार्याचा उल्लेख केला.   प्रा.आदिती ताई पोहरे यांचा शिक्षण क्षेत्रात असलेल्या संबंध व शेतकरी शेतमजुरासाठी दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि समाजसेवेची दोन्ही घराण्याची परंपरा लक्षात घेता त्या सक्षमपणे कार्य करतील यासाठी त्यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मी शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांनी (Prof. Aditi Rishikesh Pohare) आदितीताईंच्या रूपाने शिक्षण क्षेत्रातील समस्याची जाण असणारे व्यक्तिमत्व असून आपल्या अमरावती विधान परिषदेतील मतदारसंघातून प्रथमच महिला  शिक्षक आमदार म्हणून निवडून द्यावे अशी विनंती मतदारांना केली.

यावेळी मंचावर मृणालिनी हर्षवर्धन सपकाळ, वृषालीताई बोंद्रे, एड्. बाबासाहेब भोंडे, मधुकरराव पाटील, प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम वायाळ, प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे,  या कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम वायाळ तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे यांनी केले.

संबंधित सामग्री

प्रा. अदिती ताई पोहरे यांच्या प्रचाराचा चिखली परिसरात झंझावात!

प्रा. अदिती ताई पोहरे यांच्या प्रचाराचा चिखली परिसरात झंझावात!

Prof. Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचाराला चिखली शहरासह तालुक्यात वेग

Oct 11, 2026
प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा

प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा

Prof. Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचारार्थ अकोला.

Oct 08, 2026