प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे

प्रा. अदिती ताई पोहरे यांच्या प्रचाराचा चिखली परिसरात झंझावात!

Prof. Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचाराला चिखली शहरासह तालुक्यात वेग

प्रा. अदिती ताई पोहरे यांच्या प्रचाराचा चिखली परिसरात झंझावात!

Prof. Aditi Rishikesh Pohare

 

शाळा-शाळांत शिक्षकांशी संवाद; शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याचा निर्धार

चिखली (Prof. Aditi Rishikesh Pohare) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे (Prof. Aditi Rishikesh Pohare) यांच्या प्रचाराला चिखली शहरासह तालुक्यात वेग आला आहे. विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देत शिक्षकांशी थेट संवाद साधण्यावर प्रचारात भर देण्यात येत असून, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी आणि शिक्षकांच्या हक्कांच्या मुद्द्यांना या माध्यमातून केंद्रस्थानी आणण्यात येत आहे.

प्रा पुरूषोत्तम वायाळ,प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे, प्राचार्य डॉ. अनंतकुमार चेके आणि दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी समाधान गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली चिखली शहर व तालुक्यात प्रचार दौरा राबविण्यात आला. या दौऱ्यात विविध शाळा व शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन शिक्षकांशी चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या समस्या जाणून घेतानाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रा. अदिती पोहरे यांची भूमिका आणि त्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प
प्रा. अदिती पोहरे (Prof. Aditi Rishikesh Pohare) यांच्या प्रचार साहित्यामध्ये शिक्षकांच्या सेवा, सन्मान आणि आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित विविध मुद्दे मांडण्यात आले आहेत. निवृत्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न, आमदारकीची पेन्शन न घेण्याची भूमिका, शिक्षकांच्या वेतन व सेवा विषयक प्रश्नांवर पाठपुरावा आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रलंबित अडचणी सोडविण्याचा निर्धार हे मुद्दे विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले आहेत.

याशिवाय शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर करणे, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे, शिक्षक भरती व पदोन्नतीसंबंधी अडचणी सोडविणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे आणि शैक्षणिक संस्थांमधील पायाभूत सुविधांना चालना देणे, अशा विषयांनाही प्रचार साहित्यामध्ये स्थान देण्यात आले आहे. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना संशोधन, स्पर्धा परीक्षा आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात प्रभावी वापर करणे तसेच शैक्षणिक गुणवत्तेत वाढ घडवून आणणे, याबाबतही उमेदवाराच्या भूमिकेची माहिती शिक्षकांना देण्यात आली.

शिक्षकांशी थेट संवादातून प्रचाराला गती
या प्रचार दौऱ्यादरम्यान शिक्षकांनी आपल्या अडचणी, प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील अपेक्षा मांडल्या. शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित करत, शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठविण्याच्या भूमिकेवर चर्चा झाली. शिक्षक मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून करण्यात आला.

या प्रचार दौऱ्यात गजानन वायाळ, सचिन नवघरे, विनोद पाटील, रवींद्र सावळे, सतीश बिसेन, संजय जुनारे, मनमोहन वरखेडे, मुख्याध्यापक चौथे सर आणि प्राचार्य डॉ. संजय पाढेन यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. चिखली शहर आणि तालुक्यातील शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचत शिक्षकांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याच्या या उपक्रमामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील प्रचाराला गती मिळाली आहे. शिक्षकांचे प्रश्न, त्यांचा सन्मान आणि शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास हे मुद्दे या प्रचाराचे प्रमुख केंद्रबिंदू ठरत आहेत.

संबंधित सामग्री

बदलत्या भारतासाठी सक्षम शिक्षक आमदार हवा: माजी आमदार राहुल बोंद्रे

बदलत्या भारतासाठी सक्षम शिक्षक आमदार हवा: माजी आमदार राहुल बोंद्रे

Prof. Aditi Rishikesh Pohare: अमरावती विधान परिषद शिक्षक मतदार संघातील 26 उमेदवारांमध्ये प्रा. आदिती ताई ऋषिकेश पोहरे (Prof. Aditi Rishikesh Pohare) या सक्षम उमेदवार दिसून येतात.

Oct 14, 2026
प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा

प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा

Prof. Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचारार्थ अकोला.

Oct 08, 2026