अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणूक
अकोला (Prof. Aditi Rishikesh Pohare) : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचारार्थ अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था चालकांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, 7 ऑक्टोबर रोजी अकोला येथील हॉटेल वेलकम येथे आयोजित करण्यात आली. ही बैठक अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष साजिद खान पठाण यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे (Prakash Pohare), काँग्रेस अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, राज्य प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, महानगर अध्यक्ष महेंद्र गवई, मो. युसुफ, दाता मायनॉरिटी संस्थेचे अध्यक्ष मो. फारुक यू. टी. बी ए.चे अध्यक्ष साबीर कमाल मो. इरफान यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, शैक्षणिक संस्थांचे चालक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार साजिद खान पठाण यांनी उपस्थित संस्था चालकांशी संवाद साधत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे महत्त्व स्पष्ट केले. शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच शिक्षण क्षेत्रासमोरील विविध प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी अभ्यासू, सक्षम आणि संवेदनशील नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, शैक्षणिक संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच संस्था चालकांच्या विविध मागण्यांबाबत आपले विचार व्यक्त केले. उपस्थित संस्था चालकांनीही आपल्या समस्या, अडचणी व अपेक्षा मांडल्या. आगामी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे (Prof. Aditi Rishikesh Pohare) यांच्या प्रचारासाठी संघटितपणे कार्य करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीस अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे चालक, पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सरफाराज अहमद व आभार साकिर अली यांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोहम्मद युसुफ, आमदार साजिद खान पठाण यांचे पीए सय्यद अहमद यांनी अथक परिश्रम घेतले.
यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थेचे सरफराज खान मोहम्मद फारुख, शोएबुर रहेमान, आरिफ सर, अब्दुल गणी, शेख इब्राहिम शेख जमीर, अब्दुल्ला भाई, जैद अहमद इमरान उल हक ऐहसान, शेख तोकीरउल्ला खान अनिस खान, सय्यद नासिर, शेख अनीस, मोहम्मद अकबर मोहम्मद मुबीन, अकबर अली, मोहम्मद सलीम कमरोद्दीन, प्रा. बिस्मिल्ला खान, मोहम्मद अफसर, अब्दुल रियाज, अब्दुल मतीन, रफीक खान रियाज खान, ख्वाजा निजामुद्दीन, सय्यद शाकिर अली, मो. अकरम मोहम्मद मजहर, काझी सय्यद मोहसिन, आयुब खान, इलियास अन्सारी यांचेसह संस्थाचालक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
अभ्यासू नेतृत्वाला संधी देणे गरजेचे
शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे (Prof. Aditi Rishikesh Pohare) यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाला संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार साजिद खान पठाण यांनी यावेळी केले.