प्रा. अदिती पोहरे

प्रा. अदिती पोहरे यांची उद्या मानोरा येथे शिक्षक संवाद बैठक

Prof. Aditi Pohare: अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर रोजी होत असून या मतदारसंघासाठी प्रा. अदितीताई ऋषिकेश पोहरे (Prof. Aditi Pohare) यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली..

प्रा. अदिती पोहरे यांची उद्या मानोरा येथे शिक्षक संवाद बैठक

Prof. Aditi Pohare

मानोरा (Prof. Aditi Pohare) : अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर रोजी होत असून या मतदारसंघासाठी प्रा. अदितीताई ऋषिकेश पोहरे (Prof. Aditi Pohare) यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली असून त्यांची संवाद बैठक उद्या दिनांक १२ ऑक्टोबर रोजी धामणी मानोरा येथील स्व . भीमरावजी पाटील स्मृती सभागृह  येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी तसेच संस्थाचालक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बैठकांमध्ये सर्व शाळांतील शिक्षक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामनाथ राठोड व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष काशीराम राठोड यांनी केले आहे. 

प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे (Prof. Aditi Pohare) या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या महिला उमेदवार असून त्यांचे शिक्षण एम.ई. स्ट्रक्चरल डिझाईन फर्स्ट, विथ डिस्टिंक्शन (गोल्ड मेडलिस्ट) तसेच एम.ए. सायकोलॉजी फर्स्ट विथ डिस्टिंक्शन असे असून त्या गेल्या १७ वर्षांपासून श्री शिवाजी शिक्षण संस्था अकोला येथे इंजिनिअरिंग कॉलेजवर प्राध्यापिका आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या त्या सुकन्या असून शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांच्या स्नुषा आहेत. त्यांची संवाद बैठक उद्या १२ ऑक्टोबर रोजी मानोरा येथे दुपारी २.०० वाजता पार पडणार आहे. यावेळी त्या शिक्षकांशी विविध विषयांवर मनमोकळी चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. तसेच शिक्षकांच्या अडचणींबाबत जाणून त्यावर देखील आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.

तरी आयोजीत कार्यक्रमाला  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी, सर्व मतदार शिक्षक बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

टैग्स: Prof Aditi Pohare

संबंधित सामग्री

शिक्षक मतदारसंघात काँग्रेसची ताकद दाखवा! पोहरे यांच्या विजयासाठी एकजुटीने कामाला लागा

शिक्षक मतदारसंघात काँग्रेसची ताकद दाखवा! पोहरे यांच्या विजयासाठी एकजुटीने कामाला लागा

Congress candidate Prof. Aditi Pohare: ''केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे,'' असा निर्धार व्यक्त करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक

Oct 08, 2026