शक्तीपीठ महामार्ग विरोध

शक्तीपीठ महामार्गाला विरोध करा; शेतकऱ्यांनी विजय वडेट्टीवार यांना ठेचा-भाकर खाऊ घालत दिले निवेदन

Shaktipeeth Expressway Andolan: शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेत त्यांना ठेचा-भाकर खाण्यासाठी दिली आणि आपल्या मागणी..

शक्तीपीठ महामार्गाला विरोध करा; शेतकऱ्यांनी विजय वडेट्टीवार यांना ठेचा-भाकर खाऊ घालत दिले निवेदन

Shaktipeeth Expressway Andolan

हिंगोली (Shaktipeeth Expressway Andolan) : शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेत त्यांना ठेचा-भाकर खाण्यासाठी दिली आणि आपल्या मागणीचे निवेदन हिंगोलीत गुरुवारी सादर केले.

काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार हे हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याकरता दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. बुधवारी सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील पाहणी केल्यानंतर आठ ऑक्टोबरला हिंगोली व सेनगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यावर त्यांनी दुपारी हिंगोलीत पत्रकारांची वार्तालाप केला यावेळी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये भेट घेऊन निवेदन दिले. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गाला काँग्रेस पक्षाने प्रखर विरोध करावा. हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराने हा मुद्दा सभागृहात लावून धरावा.

मागच्या अधिवेशनात (Shaktipeeth Expressway Andolan) सतेज पाटील वगळता काँग्रेसच्या एकाही आमदाराने हा मुद्दा मांडला नाही, याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. याच प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोबत आणलेली ठेचा भाकरी ही विजय वडेट्टीवार यांच्या हातामध्ये देऊन "आमची चटणी-भाकर, ठेचा-भाकर खा, पण आमच्या न्याय्य मागणीसाठी अधिवेशनात आवाज उठवा," अशी विनंती शेतकऱ्यांनी वडेट्टीवार यांना केली.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये या महामार्गाविरोधात अजूनही आंदोलन उभे राहिलेले नाही, तिथेही पक्षाने ताकद लावावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. यावेळी पत्रकार परिषदेच्या ठिकाणीच शेतकऱ्यांनी आणलेली ठेचा-भाकर वडेट्टीवार यांनी खात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सभागृहात लढा देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते, काँग्रेसचे युवा नेते रमेश शिंदे, सुरेश आप्पा सराफ, शहराध्यक्ष मिलिंद उबाळे, यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

टैग्स: Shaktipeeth Expressway

संबंधित सामग्री

शक्तीपीठ महामार्ग: पालकमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांसोबत पोलिसांची झटापट 

शक्तीपीठ महामार्ग: पालकमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांसोबत पोलिसांची झटापट 

Shaktipeeth Expressway Protest: शासनाने प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी संतप्त शेतकरी गुरूवारी हिंगोलीत दाखल झाले होते. ध्वजारोहनासाठी येणार्‍या पालकमंत्र्यांना जाब...

Sep 17, 2026
कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला हिरवा कंदील; ४४२ किमीच्या सहापदरी महामार्गाने मुंबई–मराठवाडा प्रवासाला मिळणार वेग

कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला हिरवा कंदील; ४४२ किमीच्या सहापदरी महामार्गाने मुंबई–मराठवाडा प्रवासाला मिळणार वेग

मुंबई महानगर प्रदेशाला थेट मराठवाड्याशी जोडणाऱ्या कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवे प्रकल्पाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

Sep 05, 2026
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढतो; मोजणीस आलेल्या पथकाला पाठवले परत

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढतो; मोजणीस आलेल्या पथकाला पाठवले परत

Shaktipeeth Expressway: आज प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या टव्हा भागात पथक मोजणी करता आले असता संतप्त शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत मोजणीस आलेल्या पथकाला गाव प्रवेश कमानी पासून परत.

Aug 17, 2026
शक्तिपीठ महामार्ग नावाचे भूत गाडुन टाका: माजी खा.राजु शेट्टी 

शक्तिपीठ महामार्ग नावाचे भूत गाडुन टाका: माजी खा.राजु शेट्टी 

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी १७ ऑगस्ट सोमवार रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार तथा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

Aug 17, 2026
शक्तीपीठ महामार्गाला विरोध; संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

शक्तीपीठ महामार्गाला विरोध; संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

Shaktipeeth Expressway: जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गा करीता अनेक शेतकर्‍यांची शेती जाणार आहे. या शक्तीपीठ महामार्गाला संघर्ष समितीकडून विरोध होत आहे.

Aug 16, 2026