नागपूर (Shivmudra Dhol-Tasha Pathak) : नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नागपूरचे ‘शिवमुद्रा ढोल ताशा व ध्वज पथक’ यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले. महाराष्ट्राची पारंपरिक (Shivmudra Dhol-Tasha Pathak) ढोल-ताशा संस्कृती देशातील मान्यवरांसमोर सादर करण्याची सुवर्णसंधी या पथकाला मिळाली.
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘अॅट होम’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत १५ ते १७ ऑगस्टदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात (Shivmudra Dhol-Tasha Pathak) शिवमुद्रा पथकाने महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल-ताशा वादनाचे प्रभावी सादरीकरण केले.
या विशेष सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री तसेच देश-विदेशातील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या लोककलेचे आणि पारंपरिक वाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवण्याचा मान शिवमुद्रा पथकाला मिळाला.

राष्ट्रपती भवनात विशेष सादरीकरण
राष्ट्रपती भवनातील सभागृहात विशेष सादरीकरण करणारे महाराष्ट्रातील एकमेव पथक म्हणून (Shivmudra Dhol-Tasha Pathak) शिवमुद्रा ढोल-ताशा व ध्वज पथकाने सहभाग नोंदवला. या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा आणि ढोल-ताशा संस्कृती देशाच्या राजधानीत पोहोचली.
या सांस्कृतिक सोहळ्यात देशाच्या विविध भागांतील लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवणारी अनेक पथके सहभागी झाली होती. दक्षिण मध्य सांस्कृतिक कला केंद्राच्या सहकार्याने नागपूरच्या शिवमुद्रा पथकाला या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.
८ सदस्यांनी सादर केली कला
शिवमुद्रा पथकाचे (Shivmudra Dhol-Tasha Pathak) प्रमुख जय आसकर आणि अमित पांडे यांच्या नेतृत्वाखाली पथकातील ८ सदस्यांनी राष्ट्रपती भवनात आपली कला सादर केली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदाच्या निवासस्थानी महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल-ताशांचा निनाद घुमणे, ही नागपूरसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या निमित्ताने नागपूरच्या (Shivmudra Dhol-Tasha Pathak) शिवमुद्रा पथकाच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाची राष्ट्रीय पातळीवर नव्याने ओळख निर्माण झाली आहे.