Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

लिपिक टंकलेखन परीक्षा रद्द

पुन्हा परीक्षा रद्द! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक टंकलेखन परीक्षा रद्दबातल

Clerk-Typist Exam Cancel: राज्यातील काही भागांमधील परीक्षा केंद्रांवर १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टंकलेखन परीक्षेत गोंधळ झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाने परीक्षा रद्द..


पुन्हा परीक्षा रद्द मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक टंकलेखन परीक्षा रद्दबातल

Clerk-Typist Exam Cancel |

मुंबई (Clerk-Typist Exam Cancel) : मुंबईतील उच्च न्यायालय तसेच नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधील खंडपीठांमध्ये लिपिक पदांवरील भरती प्रक्रियेतील राज्यातील काही भागांमधील परीक्षा केंद्रांवर १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टंकलेखन परीक्षेत गोंधळ झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाने शनिवारी ही परीक्षा रद्दबातल केली. नव्याने घेण्यात येणाऱ्या टंकलेखन परीक्षेची तारीख व अन्य आवश्यक तपशील नंतर (Clerk-Typist Exam Cancel) उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी (कार्मिक) प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले.

उच्च न्यायालय प्रशासनाने ८ डिसेंबर २०२५ रोजी या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार, सध्या रिक्त असलेली पदे आणि पुढील दोन वर्षांत रिक्त होणारी पदे मिळून मुंबईतील उच्च न्यायालयात ८३० पदांची भरती होईल. नागपूर खंडपीठात १६६ पदांची आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठात ३३६ पदांची भरती होईल, असे स्पष्ट करण्यात आले. या भरती प्रक्रियेंतर्गत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची रविवार, १६ ऑगस्ट रोजी राज्यातील विविध भागांतील केंद्रांवर टंकलेखनाची परीक्षा घेण्यात आली.

मात्र, अनेक केंद्रांवरील संगणकांबाबत उमेदवारांना त्रुटींचा सामना करावा लागला. टंकलेखनासाठी आवश्यक गोष्टीच नव्हत्या, की बोर्ड नीट चालत नव्हते, केंद्रावर आसनव्यवस्था नसल्याने मिळले त्या संगणकावर बसण्याची वेळ आली, लहानशा जागेत कीबोर्ड ठेवून टायपिंग करावे लागले, यादी अत्यंत लहान अक्षरांत असल्याने क्रमांक शोधताना त्रास झाला, सर्व्हर डाऊन होता, अशा अनेक तक्रारी उमेदवारांकडून करण्यात आल्या आणि छत्रपती संभाजीनगर, कल्याण अशा काही भागांतील केंद्रांवर उमेदवारांनी आंदोलनही केले होते. छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनात ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके हेही सहभागी झाले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर, ‘राज्यभरात एजन्सीमार्फत टंकलेखनाची परीक्षा सुरळीत पार पडल्याचे कळवण्यात आले आहे. परंतु, काही केंद्रांवर, विशेषत: कल्याण व औरंगाबाद येथे उमेदवारांना तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी आहेत. याविषयीची तपासणी सुरू असून संबंधित (Clerk-Typist Exam Cancel) उमेदवारांना पुढील कार्यवाहीविषयी अधिकृतरीत्या कळवले जाईल’, असे प्रबंधकांनी १६ ऑगस्ट रोजी रात्री नोटीसद्वारे जाहीर केले होते. त्यानंतर शनिवारी, प्रबंधकांनी नवी नोटीस प्रसिद्ध करून टंकलेखनाची ती परीक्षाच सरसकट रद्दबातल ठरवली असल्याचे जाहीर केले. ही परीक्षा नव्याने घेण्याविषयीचा सर्व तपशील, तारीख व ठिकाणे यांची माहिती उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल’, असे प्रबंधकांनी स्पष्ट केले.

Related to this topic: