मान्सूनचा अर्थव्यवस्थेवर परिणाम

मान्सूनचा अर्थव्यवस्थेला फटका! खरीप उत्पादनापासून अन्नमहागाईपर्यंत परिणाम

Monsoon Economy Impact: भारताची अर्थव्यवस्था आणि मान्सून यांचे नाते अत्यंत घट्ट. देशातील मोठ्या लोकसंख्येचे उत्पन्न तसेच ग्रामीण भागातील मागणी मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असल्याने पावसाचे प्रमाण...

मान्सूनचा अर्थव्यवस्थेला फटका! खरीप उत्पादनापासून अन्नमहागाईपर्यंत परिणाम

Monsoon Economy Impact

नवी दिल्ली (Monsoon Economy Impact) : भारताची अर्थव्यवस्था आणि मान्सून यांचे नाते अत्यंत घट्ट आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येचे उत्पन्न तसेच ग्रामीण भागातील मागणी मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असल्याने पावसाचे प्रमाण, वितरण आणि वेळ यांचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. यंदा मात्र पावसातील असमानतेमुळे खरीप पिकांसमोर आव्हाने निर्माण झाली असून, त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी उत्पादन आणि अन्नमहागाईवर होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्यात देशात सरासरीपेक्षा सुमारे 16 टक्के कमी पाऊस झाला. सप्टेंबरमध्येही पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मका, कडधान्ये आणि भात यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाबाबत चिंता वाढली आहे. (Monsoon Economy Impact) पिकांच्या वाढीच्या निर्णायक टप्प्यात पुरेसा पाऊस आणि जमिनीत आवश्यक ओलावा न मिळाल्यास उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.

उत्पादन घटल्यास महागाईचा दबाव

पावसाची तूट कायम राहिल्यास खाद्यतेल, साखर, कडधान्ये तसेच अन्य कृषी उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. देशांतर्गत उत्पादन कमी झाल्यास मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहण्याची गरज वाढू शकते. परिणामी (Monsoon Economy Impact) बाजारातील पुरवठा आणि किमतींवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

अन्नमहागाई वाढल्यास त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर होण्याबरोबरच चलनविषयक धोरणावरही होऊ शकतो. त्यामुळे मान्सून हा केवळ हवामानाशी संबंधित विषय न राहता शेती, ग्रामीण उत्पन्न, महागाई आणि देशाच्या एकूण आर्थिक स्थैर्याची परीक्षा ठरत आहे. यंदाच्या पावसाचे असमान वितरण आणि सप्टेंबरमधील संभाव्य तूट लक्षात घेता, खरीप उत्पादनाची स्थिती आणि आगामी काळातील अन्नधान्यांच्या किमतीकडे अर्थतज्ज्ञ तसेच बाजारपेठेचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

980 नव्या कृषी पर्यटन केंद्रांची घोषणा; जुन्या केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष?

980 नव्या कृषी पर्यटन केंद्रांची घोषणा; जुन्या केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष?

Agri-tourism Centre: राज्यात नव्याने 980 कृषी पर्यटन केंद्रांना मंजुरी देणार असल्याची बातमी समोर आली आहे. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, उत्पादन खर्च सातत्याने वाढतो आहे, हवामानाचे संकट कायम आहे...

Oct 08, 2026
कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026
कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; EMIचा भार वाढणार? RBIचा रेपो रेट ५.५०% वर

कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; EMIचा भार वाढणार? RBIचा रेपो रेट ५.५०% वर

RBIने रेपो रेट ५.५०% केला. होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या EMIवर परिणाम होण्याची शक्यता.

Oct 07, 2026