Mobile SIM card: देशातील टेलिकॉम कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील एका नागरिकाला त्याच्या नावावर फक्त 9 सिमकार्ड मिळणार आहेत.
नवी दिल्ली (Mobile SIM card) : देशातील टेलिकॉम कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील एका नागरिकाला त्याच्या नावावर फक्त 9 सिमकार्ड मिळणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर 9 सिमकार्ड असतील तर त्याला 10 वे सिमकार्ड मिळणार नाही. सरकारने एका व्यक्तीकडे किती सिम कार्ड (Mobile SIM card) असावे याबाबतचे नियम कडक केले असून 24 ऑगस्टपासून टेलिकॉम कंपन्यांना ज्या व्यक्तीकडे 9 सिमकार्ड आहेत त्यांना नवीन सिमकार्ड देणे बंद करण्यास सांगितले आहे. याबाबतची माहिती पीटीआयने दिली आहे.
द डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने 17 ऑगस्टच्या तारखेचे एक परिपत्राक जारी केले आहे. त्यात (Mobile SIM card) टेलिकॉम कंपन्यांना जे व्यक्ती दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड घेऊण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांना शोधण्यासाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. अशा ग्राहकांना त्यांनी कमाल सिमकार्ड धारणाची मर्यादा ओलांडली असल्याचे सांगण्यात येईल.